पुसद उद्गगम फाउंडेशन व रुग्णमित्र फाउंडेशन पुसद तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र गौळ उपकेंद्र शेलू ( बु ) यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरिता मोफत आरोग्य तपासणी व औषध उपचार शिबीर घेण्यात आले . यावेळी डॉ . सौ विद्या राठोड , डॉ . सौ गायत्री राठोड , डॉ . सौ देविता राठोड आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र शेलू ( बु ) येथील डॉ.सौ पाटील मॅडम यांनी जवळपास 300 महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी औषधी देण्यात आल्या . या शिबिरामध्ये जवळपास दहा महिलांना गंभीर स्वरूपाचे आजार असल्याचे निष्पन्न झाले . त्यांना पुढील तपासणी व उपचारा करिता योग्य मार्गदर्शन व मदत करण्यात आले . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्गगम फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ अनिताताई मनोहरराव नाईक व प्रमुख उपस्थितीमध्ये सौ शुभांगीताई पानपट्टे , सौ वृषालीताई नाईक ( वडत्या ) ह्या उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्गगम फाउंडेशनच्या सचिव सौ सोनलताई ययाती नाईक व सूत्रसंचालन श्री सुनील गुद्धटवार यांनी केले . सदर शिबिराला यशस्वी करण्याकरिता उद्गगम फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ . रामचंद्र राठोड , रुग्णमित्र फाउंडेशनचे अध्यक्ष श्री शांतीसागर इंगोले श्री ऋषिकेश टनमने , सौ सुभा शशी चापके , श्री निकेश घाडगे , श्री भारत राठोड , श्री मिलिंद पवार , श्री पृथ्वीराज नामदेव चव्हाण , श्री अमोल जाधव , आरोग्य सेविका , आशावर्कर , शेलू ( बु ) येथील सचिव , ,ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले .
0 Comments