-->

Ads

पुसद तालुक्यातील फुलवाडी येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन





दिनांक 15/12/2022 / प्रतिनिधी  ज्ञानेश्वर मेटकर     

रोजी पुसद विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार मा. इंद्रनीलभाऊ नाईक साहेब यांच्या शुभहस्ते फुलवाडी येथे विविध कामाचे भूमिपूजन करण्यात आले.तर प्रमुख उपस्थिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ श्री बाळासाहेब पाटील कामारकर, ग्रा. पं. फुलवाडीच्या सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायतचे  सर्व सदस्य तथा ग्रामपंचायतचे सचिव, फुलवाडी, लोहरा, देवठाना परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.दलित वस्ती अंतर्गत पाच लक्ष रुपये व 25 15योजने अंतर्गत 10लक्ष   रुपयाचा निधी आमदार इंद्रनील नाईक यांनी ग्रामपंचायत फुलवाडी येथे दिला.व विकास कामांचा भूमिपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

           

          याप्रसंगी गावातील अनेक लोकांनी अनेक प्रकारच्या समस्या आमदार श्री इंद्रनील भाऊ नाईक यांनी जाणून घेतल्या निराकरण करू असे त्यांनी आश्वासन दिले.तसेच फुलवाडी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. भविष्यात सुद्धा विविध प्रकारच्या योजना गावांमध्ये आणण्यासाठी

आपण प्रयत्न करू व सर्वांनी मिळून गावाचा विकास करू असे त्यांनी उद्गार त्यांनी काढले.तसेच फुलवाडी येथील शालेय कुस्ती स्पर्धेत विभाग स्तर राज्यस्तरावर गेलेल्या विध्यार्थिनीचा व पालकांचा  सत्कार आमदार श्री इंद्रनील भाऊ नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री राजेंद्र चव्हाण यांनी तर संचालन गजानन पाचकोरे सर यांनी केले. आभार उपसरपंच ईशान चव्हाण यांनी मानले.

Post a Comment

0 Comments