-->

Ads

आई म्हणाली, त्याच्यासोबत संबंध ठेवू नकोस..., मुलीने प्रियकरासोबत मिळून केला तिचाच गेम

महिलेला तिची मुलगी आणि प्रियकर यांच्यातील संबंधांवर आक्षेप होता.




ठाणे, 30 डिसेंबर :
 राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी कल्याण येथे बलात्कार करुन पीडितेची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रियकराला भेटण्यापासून रोखल्याने 17 वर्षीच्या मुलीने आईची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -



ठाणे जिल्ह्यात आई-मुलीच्या नात्याला काळिमा फासला गेल्याची घटना समोर आली आहे. मुंब्रा परिसरात एका 17 वर्षीय मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. मृत महिलेला तिची मुलगी आणि प्रियकर यांच्यातील संबंधांवर आक्षेप होता. मुंब्रा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना बुधवारी मुंब्रा परिसरात घडली. घटनेनंतर प्रियकर आणि प्रेयसी दोन्ही आरोपी फरार आहेत. मुंब्रा पोलीस आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. मृत महिलेचे वय 37 होते. मृत महिला आपल्या किशोरवयीन मुलीला या मुलाशी मैत्री करण्यावरुन रागावली होती. यामुळे या तरुणीला राग आला होता. त्यामुले मृत महिलेच्या मुलीने प्रियकराच्या मदतीने आपल्या आईला मारण्याचा कट रचला.

तसेच संधी मिळताच आपल्या आईची चाकूने वार करत हत्या केली. यानंतर मृताच्या मुलगी आपल्या प्रियकरासह फरार झाली आहे. त्यानंतर महिलेच्या एका नातेवाईकाने तिला फोन केला पण तिने प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना माहिती दिली. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, जेव्हा पोलीस पीडितेच्या घरी पोहोचले आणि दरवाजा तोडला तेव्हा त्यांना महिलेचा रक्ताने माखलेला मृतदेह आढळला.

महिलेच्या अंगावर चाकूने वार केल्याच्या अनेक खुणा आढळून आल्या आहेत. याप्रकरणी दोन्ही आरोपींवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस आरोपी प्रियकर आणि प्रेयसीचा शोध घेत आहेत.

Post a Comment

0 Comments