पोफाळी प्रतिनिधी.
बिरसा क्रांती दलाची जिल्हा नियोजन बैठक यवतमाळ येथे दिनांक १८ डिसेंबर २२ रोजी यवतमाळ येथे संपन्न झाली. यावेळी उमरखेड तालुका अध्यक्षपदी भागवत काळे यांची एकमताने निवड करण्यात आली.
संविधान चौक लॉर्ड बुद्धा, टी.व्ही.चॅनल, यवतमाळ येथे बिरसा क्रांती दल यवतमाळ जिल्हा यांच्या वतीने जिल्हा नियोजन सभेचे आयोजन १८ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यकमाला अध्यक्ष म्हणून बिरसा क्रांती दल संस्थापक अध्यक्ष मा.दशरथजी मडावी हे होते.प्रमुख पाहुणे मा .रंगराव काळे प्रदेश अध्यक्ष, डी.बी.अंबुरे राज्य उपाध्यक्ष, गिरीजाताई उईके राज्याध्यक्ष महीला फोरम, किरण कुमरे राज्य महासचिव, सुभेदार नारायण पिलवंड राज्याध्यक्ष बिरसा व्हालिंटिअर फोर्स, विष्णुजी कोवे राज्य संघटक हे उपस्थित होते.
बिरसा क्रांती दल आदिवासी महापुरुषांचे आत्मसन्मानाचे आंदोलन चालवित असुन आदिवासींवर विविध पातळीवरती हल्ले होत आहेत.ते हल्ले परतवुन लावायचे असतील तर संघटनात्मक बांधणी मजबुत केली पाहिजे. त्यासाठी संघटनेचे सात्यत्यपुर्ण काम आणि कार्यक्रमाचे नियोजन करुन ते राबविले पाहीजे असे विचार यावेळी दशरथ मडावी व्यक्त केले.यावेळी उमरखेड तालुका अध्यक्षपदी भागवत काळे यांची निवड करण्यात आली. सोबतच पदाधिकाऱ्यांना तालुका व गावपातळीवरील नियुक्ती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आल्या.
कार्यक्रमाचे आयोजन रमेश भिसनकर जिल्हाध्यक्ष, संजय मडावी जिल्हा महासचिव,पुष्पा ससाने जिल्हाध्यक्ष ,अनिल पेंदोर उपाध्यक्ष, शेषराव इंगळे उपाध्यक्ष,तुकाराम जुमनाके उपाध्यक्ष, रमेश मडावी उपाध्यक्ष, रामेश्वर ढगे संघटक,प्रकाश ढगे संघटक,अजय ढंंगारे,शरद चांदेकर,यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मेजर जीवन कोवे,अशोक ढोले,संगित पवार,काशिनाथ खरवडे,रवी खाकरे,अनंता पांडे मुळावा, प्रविण देवकर तरोडा,विजय काळे,रेखा पोयाम,विशाल राजगडकर यांनी मेहनत घेतली.कार्यक्रमाचे संचलन संजय मडावी यांनी तर आभार मंजली साखरकर यांनी केले . कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून बिरसा क्रांती दलाचे पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments