उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर जिल्ह्यामध्ये शिक्षकाने एका क्षुल्लक कारणावरून सातवीच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे.
शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार
मारहाणीच्या प्रकरणात तक्रार प्राप्त झाली असून, तपास पूर्ण झाल्यानंतर दोषी असणाऱ्या शिक्षकावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन जिल्हा विद्यालयाचे निरीक्षक देवकी सिंह यांनी दिलं आहे. जखमी विद्यार्थी सदाशिव इंटर कॉलेज कुल्ली इथं इयत्ता सातवीत शिकतो. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळे डोकं फुटलं आहे. मारहाणीच्या प्रकरणानंतर जखमी विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी शिक्षकाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. शिवाय जिल्हा विद्यालयातल्या निरीक्षकांकडे देखील कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना पीडित विद्यार्थ्याने सांगितलं, की 'शिक्षकांनी गणित विषयाशी संबंधित काही प्रश्न विचारले होते. त्या वेळी मी उभा राहून त्यांच्याकडे पाहत होतो. शिक्षकांना या गोष्टीचा प्रचंड राग आला आणि संताप व्यक्त करून त्यांनी माझे केस ओढून आधी जमिनीवर आपटलं आणि नंतर बेंचवर डोकं आपटायला सुरुवात केली. या प्रकारामुळे माझं डोकं फुटलं.'मारहाणीमुळे प्रमोदच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. डॉक्टरांना अनेक टाकेही घालावे लागले आहेत. या प्रकरणात डीआयओएस यांनी मुख्याध्यापकांकडे चौकशी केली आहे. शिक्षकाविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
मारहाणीची ही घटना घडल्यानंतर शिक्षण विभागाने याची गंभीर दखल घेतली आहे. मारहाण झाल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, शिक्षण विभागाकडे देखील संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
0 Comments