खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली. दरक्शा रईसोद्दीन कुरेशी अस चिमुकलीचे नावं आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बीड शहरातील झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन झियाओद्दीन कुरेशी हे भाड्याने राहतात. सकाळी साडेनऊ वाजता दरक्शा ही खेळत असताना चौथ्या मजल्यावरून खाली पडली. तिचा मृत्यू झाला. बीड शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरातील झमझम कॉलनी येथे रईसोद्दीन झियाओद्दीन कुरेशी हे भाड्याने राहतात. ते अपार्टमेंटमध्ये चौथ्या मजल्यावर राहत होते. दरम्यान त्यांची मुलगी दरक्शा कुरेशी ही सकाळी खेळत होती. यावेळी अचानक तिचा तोल गेल्याने चौथ्या मजल्यावरून ती थेट खाली पडली यामध्ये तीचा मृत्यू झाला. खेळता खेळता चौथ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात यापूर्वी देखील अनेक स्त्री भ्रूण हत्येच्या घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा एकदा अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेनं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. स्वच्छता गृहातील बकेटमध्ये स्त्री जातीचे मृतावस्थेतील अर्भक आढळून आले आहे. बीडच्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही घटना आहे.
रुग्णालयाच्या अपघात विभागामधील स्वच्छतागृहातील पाण्याच्या बकेटमध्ये आज सकाळी हे अर्भक आढळून आले. ज्या बकेटमध्ये हे अर्भक आढळले ती पाण्याने भरलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भक पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 35 नंबर हा अपघात विभाग आहे. येथे रुग्ण, नातेवाईक यांची मोठी गर्दी असते. याच गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी अज्ञाताने अंदाजे दोन दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक येथील स्वच्छता गृहातील बकेटमध्ये टाकून पलायन केले. हे अर्भक ज्या बकेटमध्ये आढळून आले आहे, ती बकेट पाण्याने भारलेली होती. त्यामुळे पाण्यात बुडवून अर्भकाला मारले की मृत अर्भकच पाण्याच्या बकेटमध्ये टाकले याचा तपास आता पोलीस करत आहेत.
0 Comments