-->

Ads

पतीला सोडून 2 मुलांची आई प्रियकरासोबत फरार झाली अन् फसली; Love Story चा झाला भयानक शेवट

 

तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली ही महिला आपलं घर सोडून त्याच्याकडे राहायला आली होती, मात्र तिची फसवणूक झाली. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.




इंदूर 20 डिसेंबर : एका तरुणाच्या प्रेमात विवाहित महिलेनं आपल्या पतीला सोडलं. मात्र, पुढे तिच्यासोबत जे काही घडलं ते अतिशय भयानक होतं. प्रेमात ही महिला आपला संसार सोडून या युवकासोबत राहण्यासाठी गेली. मात्र, नंतर तिला पश्चातापशिवाय काहीच मिळालं नाही. आता तिने या युवकाच्या विरोधात पोलिसांत धाव घेतली आहे. ही घटना मध्यप्रदेशच्या इंदूरमधील आहे.

तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली ही महिला आपलं घर सोडून त्याच्याकडे राहायला आली होती, मात्र तिची फसवणूक झाली. लग्नाच्या बहाण्याने तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. महिलेने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकल्यानंतर तो पळून गेला आणि त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केलं. आता पीडित महिलेच्या तक्रारीवरून महिला पोलीस ठाण्यात बलात्काराच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




इंदूरच्या महिला पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत पीडितेनं म्हटलं आहे की, ती फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने पतीसोबत हॉटेल पार्टीला गेली होती. तिथे तिची भेट रोहित सिंगशी झाली. त्यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. पीडितेने पुढे सांगितलं की, तिने रोहितला सांगितलं की ती विवाहित आहे आणि दोन मुलांची आई आहे. यावर रोहित म्हणाला की 'तू माझ्याकडे ये, मग आपण दोघं लग्न करू'.

महिलेनं पोलिसांना सांगितलं की, पती तिला मारहाण करायचा. नवऱ्याच्या वागण्याने तिला खूप त्रास होत होता. ती रोहितला तिच्या पतीच्या वागण्याबद्दल सांगायची. रोहित प्रत्येक वेळी हेच म्हणायचा की तुझ्या नवऱ्याला सोडून माझ्याकडे ये. मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही. यानंतर महिला पतीला सोडून दोन मुलांसह रोहितकडे राहायला गेली.



पीडितेनं सांगितलं की, 'पतीचं घर सोडून मी रोहितकडे राहायला गेले होते. रोहितने आम्हाला चांगलं ठेवलं. यादरम्यान आमच्यात संबंधही निर्माण झाले. मी लग्नाबद्दल बोलले की तो टाळायचा. हळूहळू त्याच्या वागण्यात बदल होऊ लागला. मग तो मला इंदूरला सोडून सतना येथे गेला. काही दिवसांनी रोहितचं सतना येथील एका मुलीशी लग्न झाल्याचं कळलं. मी रोहितला फोन केला, पण त्याने माझे कॉल्स घेणं बंद केलं'.

लग्नाच्या बहाण्याने विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे, असं महिला ठाण्याच्या प्रभारी यांनी सांगितलं. पीडित महिलेच्या तक्रारीवरून विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे. लवकरच आरोपी तरुणाला अटक करण्यात येईल

Post a Comment

0 Comments