-->

Ads

फुलसांवगी येथे आखेर ग्रामीण भागात आनंदाचा शिधा पोहचला

फुलसावंगी येथे आनंदाचा शिद्याचे वाटप

माहागाव प्रतिनिधी :- संजय जाधव

  


 बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत अशा आनंदाच्या शिद्याचे वाटप आज फुलसावंगी येथील स्वस्त धान्य दुकानात वाटप करण्यात आले.

   राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी स्वस्त स्वरूपात व फक्त १०० रुपयांमध्ये प्रत्येकी एक किलो रवा,चणाडाळ,साखर आणि खाद्यतेल असा आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला होता.

  दिवाळी पुर्वी आनंदाच्या शिद्याचे वाटप होणे अपेक्षित होते परंतु प्रशासनाच्या नियोजन शुन्य कारभारामुळे फुलसावंगी परिसरातील सर्वसामान्यांना आनंदाच्या शिद्याचा आनंद दिवाळी ला घेता आला नाही.दिवाळी नंतर का होईना आज रोजी फुलसावंगी येथील राशन दुकानदार संजय वैद्य व राशन दुकानदार शे.रिजवान शे.मुस्ताक यांच्या स्वस्त धान्य दुकानात आनंदाच्या शिद्याचे वाटप करण्यात आले.

  यावेळी लाभार्थांना आनंदाच्या शिद्याच्या किटचे वाटप करण्यात आले.त्यामुळे सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

Post a Comment

0 Comments