प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
पुसद: येथे उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पुसद तालुका विधी सेवा समिती व पुसद न्यायालयात शनिवार दि. १२ नोव्हेंबर२०२२ रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास तलाव ले-आउटमधील पुसद न्यायमंदिरात लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.यात सहभागी होऊन पक्षकारांनी .लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा,असे आवाहन पुसद तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक व्ही. बी. कुळकर्णी यांनी केले आहे .
न्यायदानाची प्रक्रिया क्लिष्ट आहे. न्यायालयात असंख्य प्रकरणे तुंबून पडली आहेत.न्यायालया वरील ताण वाढत आहे. त्यामुळे गोरगरीबांना जलद गतीने न्याय देण्याचा उद्देश साध्य होत नाही.पक्षकारांची वेळ व पैशाची बचत करण्यासाठी लोकन्यायालय उपयुक्त असून याद्वारे सामोपचार,तडजोडीतून न्यायालयीन प्रकरणात दोन्ही बाजूंचे समाधान होऊ शकते. न्यायालयावरचा भार कमी होऊन गोरगरीबांना समाधानाने व लवकर न्याय मिळू शकतो.त्यामुळे लोक न्यायालयाकडे लोकांचा कल वाढला आहे .या प्रक्रियेत लोकांमध्ये लोकन्यायालया विषयी अधिक विश्वास निर्माण झाल्यास लोकन्यायालयाची चळवळ अधिक बळकट होऊ शकते,असे मत जिल्हा न्यायाधीश व्ही.बी. कुळकर्णी यांनी व्यक्त केले .शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकन्यायालयात मोटार वाहन कायदा अंतर्गतची प्रकरणे, निगोशिएबल इन्टुमेंट ॲक्ट कायद्या अंतर्गतची कलम १३८ ची प्रकरणे, बँक व फायनान्स कंपनीचे वसुली प्रकरणे,भुसंपादन प्रकरणासह शेतजमिनी विषयक प्रकरणे, कर भरणा, वीज बिल, पाणी बिल प्रकरणासह फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, वैवाहिक व इतर दिवाणी प्रकरणांचा समावेश राहणार आहे.याक न्यायालयासाठी न्यायाधीश , वकील व सामाजिक कार्यकर्ता यांचा समावेश असलेले सहा पॅनल्स तयार करण्यात आले आहे. या लोक न्यायालयाला पक्षकारांनी सहयोग द्यावा, असे जिल्हा न्यायाधीश व्ही.बी. कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे.
0 Comments