-->

Ads

प्रेमप्रकरणातून भिवंडीतल्या युवकाची घृणास्पद हत्या, कारण ऐकून व्हाल हैराण

 

एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या बालमित्राचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याच्या तोंडात कोंबला आणि नंतर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली.



    अलीकडच्या काळात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. गुन्हे करण्याच्या पद्धतीदेखील दिवसेंदिवस अधिकाधिक क्रूर होत आहेत. प्रेमप्रकरणातून गंभीर गुन्ह्यांची संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातल्या भिवंडीमधलं हत्या प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. गर्लफ्रेंडच्या कारणावरून एका तरुणाने अत्यंत घृणास्पद आणि भयंकर पद्धतीनं एका व्यक्तीची हत्या केली आहे. एका तरुणाने रागाच्या भरात आपल्या बालमित्राचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याच्या तोंडात कोंबला आणि नंतर चाकूने वार करून त्याची निर्घृण हत्या केली. या हत्येमुळे पोलिसांनादेखील धक्का बसला आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचं दिसून येत आहे.


    ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमधल्या 21 वर्षांच्या अस्लम अन्सारी या युवकाने प्रेमप्रकरणातून त्याचा मित्र आणि हॉटेलचा मालक शमीम अन्सारीची हत्या केली. शमीमच्या एका कृत्यामुळे अस्लम कमालीचा अस्वस्थ झाला होता. त्यामुळे अस्लम याने शमीमचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याच्या तोंडात कोंबला. हे घृणास्पद कृत्य करूनही त्याचं मन भरलं नाही. म्हणून त्याने शमीमची चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. `या घटनेनंतर आरोपी अस्लम अन्सारी याला अटक करण्यात आली आहे,` असं पोलीस सूत्रांनी सांगितलं.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अस्लमने शमीमची हत्या करण्यापूर्वी 'तुझ्या चार ते पाच गर्लफ्रेंड आहेत, कृपया माझ्या गर्लफ्रेंडला सोड,' अशी विनंती त्याला केली होती; पण शमीम ऐकण्यास तयार नव्हता. त्यानंतर अस्लमने रागाच्या भरात शमीमचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याच्या तोंडात कोंबला. त्यानंतर त्याची चाकूने वार करून हत्या केली.


    दरम्यान, अस्लमने पोलिसांना सांगितलं, `मृत शमीम अन्सारी माझा बालमित्र होता. त्याच्या अनेक गर्लफ्रेंड होत्या. तरीदेखील शमीमने माझ्या गर्लफ्रेंडसोबत जवळीक साधण्यास सुरुवात केली. 'मला तुझी गर्लफ्रेंड आवडू लागली आहे,' असं शमीमने मला एकदा सांगितलं. त्यानंतर आम्हा दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली. 'तू जर तुझं कृत्य थांबवलं नाहीस तर परिणाम वाईट होतील,' अशी धमकीदेखील मी शमीमला दिली होती. त्यानंतरही शमीम सुधारला नाही. त्यामुळे मी त्याची हत्या केली.`

    हत्येचा हा घृणास्पद प्रकार पाहून पोलिसांनादेखील धक्का बसला आहे. या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

    Post a Comment

    0 Comments