उमरखेड प्रतिनिधी :
तालुक्यातील माणकेश्वर येथे 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता च्या दरम्यान तुळशीचे लग्न लावत असताना बाबाराव मोतीराम पतंगे वय 27 वर्षे यांच्या घरासमोर लक्ष्मण परमेश्वर गाजुलवार रा . माणकेश्वर वय 30 हा व्यक्ती डफडे वाजवीत होता
त्यास डफडे वाजवू नको असे बाबाराव पतंगे यांनी घराबोहर येऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते त्या दरम्यान दोघांमध्ये झटापटी झाली आणि झटापटीतून बाबाराव मोतीराम पतंगे यांच्या गुप्तांगावर लागण्याकारनाने त्याचा मृत्यू झाले असे मृतक बाबाराव मोतीराम पतंगे यांचे वडील मोतीराम पतंगे यांच्याकडून सांगण्यात आले
सायंकाळी साडेसातच्या दरम्यान दारूच्या नषेत लक्ष्मण गाजुलवार हा व्यक्ती आमच्या घरासमोर येऊन डफडे वाजवीत होता असे माझ्या मुलांकडून सांगण्यात आले परंतु त्यांनी शिवीगाळ करत बेताल वक्तव्यात बोलून झटापटी सुरुवात केली या झटापटी दरम्यान माझा मुलगा नामे बाबाराव मोतीराम पतंगे यास गंभीर दुखापत झाली लगेच माझ्या मुलाला ब्राह्मणगाव येथील डॉक्टर कडे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी उमरखेड येथील शासकीय रुग्णालय येथे नेण्यास सांगितले रात्री साडेनऊच्या दरम्यान शासकीय रुग्णालय येथे दाखल झाले असता डॉक्टरांनी तपासणी दरम्यान बाबाराव मोतीराम पतंगे यास मृत घोषित केले व पार्थिव शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले प्राथमिक तपास उमरखेडचे पोलीस उपनिरीक्षक विनीत घाटोळ अंकुश शेळके रमेश दगडगावकर यांनी केले सदर प्रकरण बिटरगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्यामुळे पुढील तपास बिटरगाव पोलीस स्टेशन ठाणेदार प्रताप बोस करीत असल्याची माहिती मिळाली आहे मृतकाच्या पाठीमागे आई-वडील भाऊ पत्नी व एक वर्षाची मुलगी आहे याघटनेमुळे माणकेश्वर गावात शोककळा पसरली आहे
0 Comments