* प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर*
यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे हे काल दिनांक, 4 नोव्हेंबर 2022 रोजी पुसद दौऱ्यावर आले होते.
पुसद उपजिल्हा रुग्णालय येथे विशेष भेट देण्यात आली या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.,अधिकारी,कर्मचारी परिचारिका, यांची विशेष भेट घेण्यात आलि.
पुसद उपजिल्हा रुग्णालय हे विविध विषयाच्या चर्चेत राहिलेले रुग्णालय आहे, या रुग्णालयातील सोयी सुविधा पाहता अनेक सामाजिक कार्यकर्ता, नगरसेवक इत्यादीने या रुग्णालयातील सुविधा, सामान्य नागरिकांना मिळाव्या म्हणून आंदोलन, उपोषण केले व निवेदने देण्यात आली.
या रुग्णालयाचा सोयी सुविधांच्या बाबतीत वाद नेहमीच चव्हाट्यावर आलेला आहे या रुग्णालयाचा कारभार हा नेहमी प्रभात पदावर राहिलेला आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 4 नोव्हेंबर रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उपजिल्हा रुग्णालयात प्रवेश करताच् डॉ. अधिकारी कर्मचारी यांची चांगलीच कान उघडनि केली.
या ठिकाणी अस्तित्वात असलेल्या स्वच्छतागृहात सामान ठेवून ते स्वच्छतागृह बंद.
रुग्णालयातील इमर्जन्सी। वार्ड येथील एक्झिट बंद,
नवीन रूमचे बांधकाम, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्वच्छतागृह, जिल्हाधिकारी यांनी स्वतः रुग्णालयाची पाहणी केल्याने रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगल्या गेली,
नव्याने सोनोग्राफी, कक्षाचे
उद्घाटन करण्यात आले जास्तीत जास्त सोनोग्राफी सरकारी रुग्णालयात झाले पाहिजे,
तसेच महात्मा फुले योजने अंतर्गत जास्तीत जास्त रुग्णांना फायदा झाला पाहिजे
असे निर्देश आदेशित केले.
येथील परिचारिका कॉलेज मंजुरात असून या ठिकाणी पदभरतीचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. परिचारिका याना स्वतःची महाविद्यालयाची इमारत नसून उपलब्ध असलेल्या क्वार्टरमध्येच त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
येणाऱ्या काळात परिचारिका महाविद्यालय एक वर्षाच्या आत मध्ये बांधून तयार होईल असे आश्वासन येथील उपस्थित कर्मचारी अधिकारी यांना
जिल्हाधिकारी यांनी बोलताना
दिले.
एन आर टी सेंटर येथील कार्यप्रणालीवर त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले। एड्स बाधित समुपदेशन केंद्र व टीबी केंद्र असलेल्या ठिकाणी कचऱ्याचा खच् पडला होता याही ठिकाणी जाऊन पाहणी करून येथील व्यवस्थापनाला सूचना करण्यात आल्या। या ठिकाणी रेगुलर स्वीपरची ची व्यवस्था करून स्वच्छता राखावी अन्यथा कठोर कारवाईस् तयार असा सूचना वजा इशारा देण्यात आला..
* यावेळेस फक्त आपणास सूचना देण्यात आल्या आहेत पुढील दौऱ्या वेळेस कामचुकारपणा झाल्यास कायदेशीर नोटीस बजावून कार्यवाही केल्या जाईल अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी समस्त डॉक्टर अधिकारी कर्मचारी परिचारिका यांना देण्यात आल्या. व तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय पुसद येथे आढावा मीटिंग घेण्यात आली शासकीय पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments