मुंबईच्या प्रसिद्ध अशा फॅशन स्ट्रीट परिसरातील दुकांनांना भीषण आग लागल्याची माहिती समोर आलीय. शॉक सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकमेकांना लागूनच दुकाने असल्याने अनेक दुकानं या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. तसेच यामुळे मोठ्य प्रमाणात नुकसान देखील झालं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
अतिशय वर्दळचा भाग असलेल्या या ठिकाणी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. दुपारच्या सुमारास या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे दुकांनांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. अचानक आग लागल्याने धावपळ सुरु झाली. आग लागल्यानंतर अग्निशमन विभागाच्या सहा गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन विभागाने शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
0 Comments