-->

Ads

पुसद बोरगडी येथे बौध्द मयत झालेल्या प्रेताची विटंबना करुन अंत्यविधी करण्यास विरोध*

परस्परा विरोधात ॲक्ट्रासिटी, विनयभंग, विविध कलमानुसार गुन्हे दाखल

प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मेटकर

पुसद पासून अवघ्या ४ की.मी.अंतरावर असलेल्या बोरगडी या गावी

 दि.22 नोव्हेंबर रोजी  ग्रा.प.बोरगडी सरपंच 


रविंद्र सुदाम ढगे 

 यांची काकु शकुंतलाबाई साहेबराव ढगे यांचे कर्करोगाने निधन झाल्यामुळे त्याचा अंत्यविधी दि. 23. नोव्हेंबर रोजी दुपारी वेळ दु.12.30 वा. दरम्यान अंत्यविधी करण्यासाठी ग्रा.प.बोरगडीची मालकीची एफ क्लास सरकार स्मशानभुमी  स.नं. ३५ या ठिकाणी करण्यासाठी गावातील सर्व समाजातील सुज्ञ मंडळी अंत्य विधीला आले. असता मयताला अग्नी देण्यासाठी सरण रचले असता या ठिकाणी  आशा भानुप्रकाश कदम माजी जि.प.सदस्य व काही सहकारी मंडळी घेऊन  प्रेताला अंत्यविधीसाठी  रचलेल्या सरणावर येवून बसल्याने अग्नी  देण्यास विरोध केला. हि जमिनी माझ्या मालकीची आहे त्यामुळे तुम्ही या ठिकाणी अग्नी देवू शंकत नाही त्यामुळे हे प्रेत या ठिकाणाहून उचला . त्यामुळे भांबावलेल्या प्रेताच्या नातेवाईक आणि सर्व जमलेल्या पाव्हणे मंडळी नी विनवणी केली.या ठिकाणी हजर असलेल्या ग्रामसेवक यांनी घटनेची माहिती फोन वरून गटविकास अधिकारी यांना देण्यात आली.तहसीलदार ठाणेदार यांना सुद्धा माहिती देण्यात आली.


सविस्तर वृत्त असे की मौजा बोरगडी येथील समशानभूमीच्या जागेवर अनेक वर्षापासून अतिक्रमण केलेले होते व स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा नागरिकांना नाल्याच्या काठावर अंत्यविधी करावा लागायचा परंतु गावातील नागरिकांनी समशानभूमी परत मिळवण्यासाठी अनेक आंदोलन उपोषण केले व त्याचे फलित म्हणून मागील दोन तीन महिन्यापूर्वी तहसीलदार भूमी अभिलेख विभागाने संबंधित जमिनीची मोजणी करून दिली व ग्रामपंचायत तिने या जागेवर आपल्या निशाने करून ही जमीन समशानभूमीची असल्याची सर्वांना सांगून या ठिकाणी अंत्यविधी करण्याचे सांगितले. त्यानंतर हा प्रकार घडला स्मशानभूमीची मालकीची जमीन ज्याचे रीतसर ग्राम पंचायत बोरगडी यांनीभूमि अभिलेख कार्यालय यांच्या कडून मोजमाप करुन ते सार्वजनिक अंत्यविधीसाठी स्मशानभूमी करिता ती जागा देण्यात आलेली आहे त्या जागेमध्ये सरण रचून अग्नी देण्यासाठी मृत्यूदेह आणला असता. आशा भानुदास कदम ह्या  रचलेल्या सरणावर जाऊन बसल्या आणि हि जमिन माझ्या मालकीची आहे इथे अग्नी लावू नका म्हणून त्यांना विरोध केला यादरम्यान झालेल्या वादामुळे सरपंच रवी ढगे वय ३५ वर्ष यांनी रितसर पुसद शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यामुळे शहर पोलीस स्टेशन मध्ये आशा भानुदास कदम व अन्य साथीदार व्यक्तींवर ॲट्रॉसिटी व अन्य कलमासह  गुन्हे दाखल करण्यात आले तसेच 


आशा भानुदास कदम वय अ.४५ वर्ष यांनीही दिलेल्या तक्रारी वरुन  ग्रांम पंचायत सरपंच पोलिस पाटीलग्रा.प. सदस्यसह इतर ९ व्यक्तीवर विनयभंग व चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणांमध्ये अंत्यविधीसाठी उपस्थित असलेल्या सरपंच पोलीस पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले म्हणून गावातील शेकडो नागरिक उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात येऊन त्यांना निवेदन सादर करून सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आलेली आहे

 सदर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांनी स्वतः घटनास्थळाला भेट देऊन संबंधित दोन्हीही गटातील व्यक्तींना शांततेचे आवाहन करण्यात आले  पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी घटनास्थळाला भेट दिली. करीत आहे

Post a Comment

0 Comments