-->

Ads

निंगनुर गावात बिरसा मुंडा जयंती जल्लोषात साजरी


 ऊमरखेड प्रतिनिधी- *संजय जाधव 

उमरखेड तालुक्यातील निंगनुर या गावी अंदाजे पंधरा ते सोळा हजार लोकसंख्या असून, त्यामध्ये निंगनुर, चिंचवाडी,टारपेवाडी,शंकरवाडी, अनंतवाडी, महादेववाडी, संतोषवाडी,हिरामणनगर,नागेशवाडी,अश्या विविध बऱ्याच वस्त्याचा समावेश आहे.हे गाव आदिवासी बहुल गाव असल्यामुळे गावामध्ये क्रांतीसूर्य महामानव भगवान बिरसा मुंडा यांची जयंती अंत्यत जल्लोषात आणि उस्ताही वातावरणात पार पडली.

यामध्ये सर्वप्रथम महर्षी दयानंद सरस्वती विद्यालयाच्या प्रांगनातून मोटरसायकल रॅली ला सुरवात झाली असून, ग्रामपंचायत मध्ये जाऊन बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून संपूर्ण गावभर रॅली काढण्यात आली.त्यामध्ये तरुण कार्यकर्त्यांनी अग्रस्थानी सहभाग नोंदवला.विविध स्वरूपाची त्यांच्या विचारांची घोषणा करून संपूर्ण गावकऱ्याचे त्या रॅलीने लक्ष वेधले...

त्यानंतर म.द.स.विद्यालयामध्ये समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला विविध विचारवंतांनी आपापल्या वाणीतून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या जीवनपटावर मार्गदर्शन केले. त्यांच्या विचारांना उजाळा देण्याचे काम केले.

त्यानंतर क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची मिरवणूक संपूर्ण गावभर काढण्यात आली असून,त्यामध्ये सर्वच समाज बांधव यांनी प्रामुख्याने सहभाग नोंदवला असून, त्यामध्ये पुरुष मंडळी,महिला मंडळी, तरुण युवा मंडळींनी सहभाग दर्शऊन सर्व कार्यकर्त्यांचा आनंद द्विगुणित केला...या एका ग्रामीण भागात एवढ्या भव्यदिव्य आणि विशाल कार्यक्रमाला सर्व गावाकऱ्याची उपस्थिती लाभल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.

उमरखेड तालुक्यातील ही सर्वात मोठी बिरसा मुंडा यांची  जयंती झाली असावी. असे सर्वत्र गावाकऱ्यामार्फत बोलल्या जाते.

Post a Comment

0 Comments