प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
दिंडीच्या गजरात फिरकले चिमुकले भक्त.
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
पुसद : कार्तिकीचा हरिनाम जपत अवघा परिसर दुमदूमलेला पाहून आमदार इंद्रनील नाईक मोहित झाले.खैरखेडा येथील कार्तिकी हरिणाम गजराच्या समाप्तीच्या मुहूर्तावर त्यांनी गावाकऱ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर गावात मागील 124 वर्षांपासून भाऊबीज च्या निमित्ताने भव्य कुस्त्यांची दंगल असते. गावातील शेकडो युवक या कुस्त्यामध्ये सहभाग नोंदवितात मात्र त्यांना व्यायाम करण्यासाठी व्यायामशाळेची आश्यकता असल्याने सुनिलभाऊ ढाले यांच्या पुढाकाराने आमदारांनी सात लक्ष निधी मंजुर करून त्याचे रीतसर भूमिपूजनही केले.महिलांचे प्रेम बघुन आमदारांनी सर्वांचे अभिष्टचिंतन केले. यावेळी आदिवासी विकास प्रकल्पाचे माजी अध्यक्ष सुनिल ढाले , सरपंच सौ मस्के, संतोष गारुळे , राजेंद्र भरकाडे , मोहन मस्के, मनोज भिषे, गजानन काळे , सचिव बुरकुले सह शकडो वारकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments