अंबरनाथमध्ये दुकानदार महिलेच्या तोंडावर स्प्रे मारून दुकानात चोरी करण्यात आल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका महिलेनेच ही चोरी केली असून ही महिला सीसीटीव्हीत कैदी झाली आहे. अंबरनाथमधील या चोरीच्या घटनेमुळे शहरात दहशत पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथ (Ambernath) पूर्वेच्या मोहन पुरम भागात निशा चव्हाण यांचं आशीर्वाद स्नॅक्स कॉर्नर हे दुकान (Shop) आहे. आज सकाळी साडेआठच्या सुमारास निशा चव्हाण या दुकानात असताना एक महिला त्यांच्याकडे आली आणि तिने त्यांच्याकडे फोन करण्यासाठी मोबाईल मागितला. मात्र निशा यांनी तिला नकार देताच तिने निशा यांच्या तोंडावर एक स्प्रे मारला.
चोरट्या महिलेने निशा चव्हाण यांच्या तोंडावर स्प्रे मारल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. काही वेळाने निशा यांना शुद्ध आल्यानंतर त्यांनी दुकानात पाहिलं असता, त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील ३ ते ४ हजार रुपयांची रोख रक्कम या महिलेनं चोरून नेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. दुकानात चोरी करणारी ही महिला सीसीटीव्हीत सुद्धा कैद झाली असून या महिलेला शोधून कारवाई करण्याची मागणी निशा चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. मात्र।दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे दुकानदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

0 Comments