-->

Ads

पुसद दंगलीतील आरोपीला 5 वर्षे सक्तमजुरी

प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

 पुसद सन 2009 मध्ये पुसद येथे रामनवमीच्या मिरवणुकीत दंगलीत आरोपींविरोधात दोष सिध्द झाल्याने आरोपीस पाच सक्तमजुरीची शिक्षेसह व 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे . याप्रकरणाचा निर्वाळा 22 नोव्हेंबर रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश क्र . 2 एन . एच . मखरे यांचे न्यायालयाने दिला आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की , 3 एप्रिल 2009 रोजी पुसद शहरामध्ये रामनवमीचे मिरवणुकीचे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे मोठी दंगल उसळली होती . सदर दंगलीमध्ये शहरातील लोक घाबरून सैरावैरा पळत होते . त्या दरम्यान जखमी जगदीश जाधव देवकृपा चौकातून न्यायालयात दोषारोपत्र दाखल जखमीचे भाऊ अॅड . भारत जाधव यांनी यांनी शहर पोलिस स्टेशनमध्ये आरोपी याच्याविरुध्द लेखी फिर्याद दिली होती . सदर प्रकरणात आरोपी इम्रान खान अस्लम खान , आरिफ खान निसार खान , शेख निसार शेख नजुल्ला यांना पोलिसांनी सदर प्रकरणात अटक करण्यात आली . सोबतच इतर सात आरोपी हे फरार असता त्यांच्या गैरहजेरीत सदर प्रकरणाची चार्जशीट दाखल करण्यात आली . सदर संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकारी पो.हे. कॉ . जाधव , पो.उ.नि. इटनारे . पो.उ.नि. घोटे . पो.उ.नि. आय . एफ . पठाण यांनी प्राथमिक तपास केला व पो.उ.नि. माकोडे यांनी संपूर्ण तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले . सायंकाळी 8 वाजताचे दरम्यान त्यांच्या मोटर सायकलने गुजरी चौकातून हनुमान वॉर्डातील घरी जात असताना ज्ञानेश्वर मंदिराचे मुख्य प्रवेश व्दारासमोर आरोपी इम्रान खान अस्लम खान , आरीफ खॉन निसार खान , शेख निसार जब्बार खान उर्फ शेके शेख नजुल्ला , शेख निसार उर्फ फुटवाला शेख हमजा , अतिक अहेमद मुश्ताक अहमद , सयद महेफुस उर्फ 12 साक्षदारांची साक्ष तपासली अतिरिक्त सरकारी वकील अॅड . रवि रूपुरकर यांनी एकंदरीत 12 साक्षदारांची साक्ष नोंदविली . त्यामध्ये जख्मी जगदीश जाधव , अॅड . भारत जाधव , तसेच जख्मीवर प्राथमिक उपचार करणारे डॉ . अमोल मालपाणी नांदेड येथील डॉक्टर मनीष देशपांडे व पुणे येथील डॉक्टर चेतन प्रधाण व तपासी अधिकारी व पंच • साक्षदारांची साक्ष महत्त्वाची ठरली . सदर प्रकरणामध्ये सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून साक्ष पुराव्याअंती आरोपींनी जखमीवर प्राणघातक हल्ला केल्याचे सिद्ध झाले . त्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायधीश क्र 2. श्रीमती एन . एच . मखरे यांनी आरोपीला फक्त मजुरी सह दंड ठोठावला आहे . टेलर सैयद रज्जाक , अब्दुल निसार राजू नजर खॉन , फिरोज खॉन जायेद खान , अब्दुल मोबीन अब्दुल सुलतान , रिजवान खुदुस चाबीवाला हे सर्व आरोपी आहाळे चौकाकडून हातात तलवार व रॉड घेऊ घोषणा देत आले व सर्व आरोपींन मिळून जख्मीवर तलवारी व गजा हल्ला करून शरीरावर 13 ठिकाणी व करून गंभीर जखमी केले .

Post a Comment

0 Comments