-->

Ads

'मी मरेल आणि तुलाही मारेल' धमकी देऊन तरुणाने 17 वर्षीय मुलीला रस्त्यावर अडवले

 

पीडित मुलीच्या घराजवळ येऊन 'माझ्यासोबत रिलेशन मध्ये ये, असे म्हणत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला





औरंगाबाद, 27 नोव्हेंबर : 'तू माझी नाही तर, कुणाचीही होऊ देणार नाही, आज मी मरेल आणि तुलाही मारील', अशी धमकी देत एका 17 वर्षीय मुलीचा विनयभंग करून तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद शहरात उघडकीस आली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक परिसरातील वडगाव कोल्हाटी इथं ही घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या परिचयातील तरुणाने हे कृत्य केलं आहे. शिवा साळुंखे असं या तरुणाचे नाव आहे.

आरोपी शिवा साळुंखे याने पीडित मुलीच्या घराजवळ येऊन 'माझ्यासोबत रिलेशन मध्ये ये, असे म्हणत त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला नकार देताच त्याने मुलीचा हात पकडून वाईट उद्देशाने जवळ 'ओढून, तू माझी नाही तर कुणाची नाही' असे म्हणत वाईट कृत्य केले. मुलीने आरडाओरड केली असता तो तेथून पळून गेला. त्यानंतर पुन्हा बजाजनगरमध्ये मुलीच्या पाठीमागे येऊन 'मी मरेल आणि तुलाही मारेल' अशी धमकी देत निघून गेला.


या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

नात्याला काळीमा, मामाकडून 22 वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

दरम्यान, औरगाबादमधून आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मानलेल्या मामाने 22 वर्षाच्या भाचीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.


ही संतापजनक घटना गंगापूर तालुक्यातील पोलीस ठाणे शिल्लेगाव येथे घडली. या घटनेनंतर आरोपी रामहरी भागण चिकने (वय 35, रा. दायगाव ता. गंगापूर जि. औरंगाबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आरोपी रामहरी भागण चिकने याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संतापजनक प्रकार 24 नोव्हेंबरला घडला आहे. यानंतर तो 26 नोव्हेंबरला उघडकीस आला.

या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळाला पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे व त्यांची टीमने भेट दिली. यानंतर आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments