राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात वंश वाढवण्यासाठी लग्न करून आणलेल्या नवरीचं नसबंदीची शस्त्रक्रिया झाल्याचं उघडकीस आलं. काही दिवस सासरी राहिल्यानंतर घरातील सर्व दागिने घेऊन फरार झाली. धक्कादायक म्हणजे चौकशी केल्यानंतर महिलेचं तिसरं लग्न झाल्याचंही समोर आलं. या प्रकरणात लुटारू नवरीच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पीडित नंदलाल सोनीने सांगितलं की, 2019 मध्ये त्याच्या पत्नीचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला होता. त्याला एकही मुल नव्हतं. त्याने एक मुलगी दत्तक घेतली होती. दरम्यान काही नातेवाईकांनी त्याला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. दुसऱ्या लग्नासाठी एक मुलगीदेखील दाखवली. पीडितेचा संसार सुरू होण्याबरोबरच वंश वाढावा यासाठी नातेवाईक प्रयत्न करीत होते. यानंतर जयपूरमधील वर्षा वर्मासोबत त्याने लग्न केलं. लग्नाच्या काही दिवसात घरातील सोन्याचे दागिने घेऊन नवरी फरार झाली.
पीडित व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्यासोबत धोका झालेला आहे. वंश वाढवण्यासाठी त्याने लग्न केलं होतं. तर लग्नानंतर कळालं की, नवरीचं आधीच नसबंदीच ऑपरेशन झालं आहे. या सर्व प्रकारानंतर पीडित नवऱ्याने पत्नीसह तिच्या नातेवाईकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्याशिवाय आरोपी वर्षाने यापूर्वी दोन लग्न केली होती. हे तिचं तिसरं लग्न आहे.
0 Comments