पतीच्या प्रेयसीला आपल्या मार्गातून काढून टाकण्यासाठी मुंबईतील एका महिलेनं असा कट रचला, जो ऐकून तुमचा थरकाप उडेल. पतीच्या प्रेयसीच्या हत्येचा कट आणि क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडून तिने मृतदेह गोणीत बांधून मध्यरात्री नाल्यात फेकून दिला. मुंबईतील या आरोपी महिलेचा संपूर्ण कारनामा जाणून तुम्हीही थक्क व्हाल.
मीनल नावाच्या महिलेच्या कारनाम्याने क्रूरतेच्या सर्व परिसीमा ओलांडल्या आहेत. मीनलनेच ईशाची निर्घृण हत्या करून तिचा मृतदेह आपली बहीण आणि डॉली नावाच्या मैत्रिणीच्या मदतीने पोत्यात भरून रात्रीच्या अंधारात कुर्ल्यातील एका नाल्यात फेकून दिल्याचे मुंबई पोलिसांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले. मात्र, मीनलला याची कल्पना नव्हती की तिच्या या कृत्याचं फळ तिला लवकरच मिळणार आहे.
ईशाचा मृतदेह नाल्यात फेकण्यासाठी या तिघींनी ज्या ऑटोचा वापर केला, तो ऑटो दुसऱ्या दिवशी मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचला. ऑटोचालकाने याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी परिसरात बसवण्यात आलेले कॅमेरे आणि रिक्षाचालकाच्या वर्णनानुसार या तिघींची ओळख पटवली. यानंतर त्यांना त्यांच्या घरातून अटक करण्यात आली.
या तिघींना अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली. हत्येचा संपूर्ण कट ऐकून पोलिसही थक्क झाले. पोलिसांनी महिलांच्या या कारनाम्याची माहिती जेव्हा लोकांना दिली तेव्हा परिसरातील लोकही शॉक झाले, की एखादी महिला इतकी क्रूर कशी होऊ शकते.
0 Comments