मध्यप्रदेशातील मंदसौर जिल्ह्यात दिवाळीनिमित्ताने भाऊ-बहिण एकत्रितपणे फटाके फोडण्यात दंग हते. मात्र यादरम्यान भावाने केलेल्या एका छोटाशा मस्करीमुळे बहिणीचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बुधवारी गोवर्धन पुजा झाल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. या घटनेनंतर सर्व घरावर शोककळा पसरली आहे. पाहता पाहता दिवाळीच्या आनंदावर विरजण पडलं.
मंदसौर जिल्ह्यातील भावगड पोलीस ठाणे हद्दीतील करजू गावात ही घटना घडली. फटाके फोडत असताना एक 20 वर्षीय तरुणी जखमी झाली आणि रुग्णालयात नेत असताना तिचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 20 वर्षीय टीना आपल्या भावासोबत मिळून फटाके फोडत होती. यादरम्यान तिच्या भावाने सुतळी बॉम्ब एका स्टीलच्या टिफिनमध्ये ठेवला. यादरम्यान टीना फटाके फोडत असताना व्हिडीओ शूट करणार होती. फटाका फुटताच त्यावर ठेवलेला टिफिन उडावा आणि तरुणीच्या पोटाला लागा. फटाकेच्या ब्लास्टमुळे टिफिनचा एक टोकदार भाग टीनाचा पोटात घुसला. यानंतर मुलीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र वाटेतच मुलीचा मृत्यू झाला.
छत्तीसगडच्या कोरियामध्ये फटाके फोडत असताना एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय जगत सिंह मित्रांसोबत फटाके फोडत होता. मुलाने स्टिलच्या ग्लासात टायगर बॉम्ब फोडला. यादरम्यान ग्लासाचा तुटलेला भाग मुलाच्या पोटाला आणि छातीला लागला. यानंतर तातडीने मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं. येथे त्याच्यावर उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. जेव्हा मुलाचं शवविच्छेदन करण्यात आलं, त्यावेळी त्याच्या पोटातून ग्लासाचे तुकडे सापडले.
सुतळी बॉम्बमुळे कानाचा पडला फाटला...
मध्यप्रदेशातील भोपाळमध्ये फटाके फो़डताना मुलाच्या कानाचा पडदा फाटला. मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरनगरमध्ये राहणारा तरुण मित्रांसोबत फटाके फोडत होता. यादरम्यान त्याला ऐकू येण्यास अडचणी जाणवत होत्या. याशिवाय कानात वेदनाही होत होत्या. जेव्हा त्याला ENT कडे नेण्यात आलं, त्यावेळी मुलाच्या कानाचा पडदा फाटल्याचं समोर आलं.
0 Comments