यवतमाळ यांच्याकडे पंचायत समिती परिसरामध्ये एक सरपंच भवन असावे यासाठी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आज सरपंचांनी या आंदोलन केले. गावोगाहून येणाऱ्या सरपंचांना पंचायत समिती स्तरावर माना सन्मानाची वागणूक न देता अनेक वेळ त्यांना ताटकळत उभे राहावे लागते गावोगावच्या समस्या घेऊन सरपंचांना नेहमीच पंचायत समितीमध्ये यावे लागते परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे या ठिकाणी त्यांना बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने सरपंच संघटनेने या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले माजी सभापतीउपसभापती यांचे असलेले कार्यालय सध्या रिकामी असून सुद्धा पंचायत समिती प्रशासन तात्पुरती बसण्याची व्यवस्था करत नसल्याचे कारणाने आज सरपंच संघटनेने या ठिकाणी ठिय्या आंदोलन केले यानंतरही या गंभीर समस्ये कडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा सरपंच संघटनेच्या वतीने देण्यात आला यावेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष काळबांडे व त्यांच्या संघटनेची पदाधिकारी व गावोगावचे सरपंच उपस्थित होते.
0 Comments