-->

Ads

लातूर : तीन मुलींनंतर झाला मुलगा, पत्नीच्या दवाखान्यासाठी पैसे नसल्याने पतीचं भयानक पाऊल


 लातूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीला तीन मुलींनंतर मुलगा झाला. मात्र, पत्नीच्या दवाखान्याच्या बिलाचे पैसे नसल्याने पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्युत तारेला लटकून त्याने आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

परळी तालुक्यातील वाका गावातील 28 वर्षीय युवकाने पत्नीच्या सिझेरियनचा खर्च करणे शक्य नसल्याच्या कारणावरून तब्बल दोन वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडलीय. विनोद माने असे त्या तरुणाचे नाव आहे. लातूर शहरातील वैशाली इडली गृह येथे एक युवक विद्युत तारेला धरुन खाली उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता.

तो विद्युत खांबावर चढत असतानाच लोकांनी विद्युत विभागास फोन करून लाईट बंद करण्यास सांगितले होते. मात्र, त्याने वरुन उडी मारली याच्यामुळे त्याच्या कमरेला मार लागला व त्याला उठता येत नव्हते. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याठिकाणी सिटीस्कॅन करण्यासाठी घेऊन गेले असता तो लघुशंकेच्या बहाण्याने बाथरुममध्ये गेला.

मात्र, तिथे त्याने बाथरुमच्या खिडकीची काच काढून घेत स्वतःवर काचेने वार करून केले. त्याला पुन्हा तिथे

उपचारासाठी दाखल करण्यात आले. विनोद माने यास तीन मुली होत्या. चौथ्या वेळी त्याला मुलगा झाला. मात्र, पत्नीचे सिझेरीयन झाल्याने दवाखान्याचा खर्च कसा करायचा. या कारणाने त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

सध्या त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तसेच विनोद माने याने आत्महत्येचा प्रयत्न केला असता या घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

Post a Comment

0 Comments