प्रतिनिधी, ज्ञानेश्वर मेटकर
कैलास सत्यार्थी चिल्ड्रन फाउंडेशन आणि सहयोगी संस्था स्व.मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ या संस्थेमार्फत पुसद तालुक्यातील 32 गावांमध्ये बालविवाह मुक्त भारत अभियान राबविण्यात आले व कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आल्या.
नोबेल शांती पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांच्या नेतृत्वाखाली "बालविवाह मुक्त भारत अभियान" राबविण्यात आले, जनजागृतीसाठी दहा हजार गावांमध्ये वेगवेगळ्या संस्थे मार्फत दिवे लावण्यात आले.
बालविवाह विरुद्ध जगातील सर्वात मोठी मोहीम, देशभरातील 500 जिल्ह्यांमध्ये लोकांना जागरूक करण्यासाठी 70 हजार महिला आणि मुलांच्या नेतृत्वाखाली दिवे प्रज्वलित करण्यात आले.
तसेच भारत सरकारच्या 2011 च्या जनगणनेनुसार देशात बारा लाख अधिक बालविवाह झाले आहेत. ज्यामध्ये जवळपास 52 लाख अल्पवयीन मुली होत्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वेचे ताजे आकडे असे सांगतात की त्यांच्यामध्ये देशातील 20 ते 24 वयोगटातील 23.3% महिला आशा आहेत ज्यांचे बालविवाह झाले आहेत.
हे प्रमाण दहा टक्क्याने खाली आणणे हे अभियानाचे उद्दिष्ट आहे.
बालविवाह मुक्त भारत अभियान पुसद तालुक्यामध्ये राबविण्याकरिता प्रयत्नशील स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता. पुसद जि. यवतमाळ या संस्थेचे अध्यक्ष: राजकुमार भगत सहकारी, अरबाज खान, विजय खेकाळे, निकेश गाडगे यांनी बालविवाह मुक्त भारत अभियान यशस्वी होण्यासाठी गावा गावामध्ये जाऊन कॅन्डल मार्च रॅली काढून तसेच जनजागृती करून प्रयत्न केले.
0 Comments