-->

Ads

कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ या तिन्ही तालुक्यातील एकूण १५०० भगिनींना पैठणीची भेट; ‘जिजाऊ’ची भाऊबीज कृतज्ञतेची !


टिटवाळा :  ( अजय शेलार )  आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात कार्य केलेल्या पोलीस, डॉक्टर्स, नर्स,आशाताई यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी २०२० पासून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाणे व पालघर जिल्ह्यात कृतज्ञतेची भाऊबीज साजरी केली जाते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भाऊबीज साजरी करण्यात येत असून आज सोमवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२२ रोजी कल्याण, उल्हासनगर व अंबरनाथ या तिन्ही तालुक्यातील एकूण १५०० भगिनींना पैठणी व भेटवस्तू देऊन भाऊबीज साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने आशाताई उपस्थित होत्या.                       कल्याण तालुक्यातील आचार्य अत्रे रंगायात,  उल्हासनगर चार मधील शासकीय प्रसुती गृह, बदलापूर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र  व अंबरनाथ पीएचसी केंद्र येथील डॉक्टर्स नर्स, आशाताई अशा एकूण १५०० भगिनींना पैठणी साडी देऊन कृतज्ञतेची भावी साजरी करण्यात आली. मागील दोन वर्षांपासून आरोग्य यंत्रणा, कायदा व सुव्यवस्था समर्थपणे सांभाळणाऱ्या कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ या तिन्ही तालुक्यातील आशाताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनींसाठी आजची भाऊबीज आनंदाची ठरली. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या संकल्पनेतून या सर्व भगिनींना पैठणीची भेट देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचं महाभयंकर संकट पसरलं, तेव्हा पासून आजपर्यंत आपल्या कुटूंबाची काळजी न करता कोरोनाच्या संकटाचा सामना करत लढत राहिल्या त्या आपल्या आशा ताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनीचं. त्यामुळेच मागील वर्षीप्रमाणेचं यावर्षीही जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेने त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जिजाऊ कृतज्ञतेची भाऊबीज साजरी करत आहे.

आपण ज्या समाजात जन्माला आलो आहोत त्या समाजाचे काहीतरी देणकरी लागतो, सर्व समाजाचे आपल्यावर असंख्य ऋण असतात ते ऋण फेडण्यासाठी छोटासा प्रयत्न म्हणून स्वकमाईतून समाजाची सेवा करण्याचं ध्येय निलेश सांबरे यांच असून आरोग्य, शिक्षण, कला-क्रीडा, महिला सक्षमीकरण, शेती, व आदी सामाजिक क्षेत्रात जिजाऊ संस्था अग्रक्रमाने विविध उपक्रम राबवत असून समाजाचा विकास करणे हेच एकमवे ध्येय असून मानवतेच्या कल्याणासाठी जिजाऊ संस्था कार्य करून आपलं कर्तव्य पार पाडत आहे.आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या आरोग्य रक्षणासाठी सेवा करणाऱ्या आशा ताई, परिचारिका, डॉक्टर व पोलीस भगिनींना स्नेहाची जिजाऊची पैठणी भेट देण्यासाठी जिजाऊ संस्थेचे स्वयंसेवक, पदाधिकारी व जिजाऊ संघटनेच्या कार्यकर्त्यानी, विशेष मेहनत घेतली.

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत असलेल्या कल्याण उल्हासनगर व अंबरनाथ या तिन्ही तालुक्यातील डॉक्टर्स, अधिपरिचारिका ताई, पोलिस ताई, आशा ताई, आणि अंगणवाडी सेविका ताई या ताईंचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आयोजित करण्यात आलेली जिजाऊची कृतज्ञतेची भाऊबीज मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

Post a Comment

0 Comments