-->

Ads

पुसद तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचा भोगळ कारभार आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

पुसद : पुसद तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांमार्फत येणाऱ्या भाजीपाल्याला सर्वप्रथम मंडईमध्ये अतिशय घाणीच्या ठिकाणावर हराशी केल्या जातो. तोच भाजीपाला पुसद तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना आरोग्याला हानिकारक होऊनच मिळतो. या ठिकाणी पाहिलेला भाजीपाला कोणताही माणूस खाणारच नाही अशा अवस्थेमध्य

  प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर मेटकर


पुसद येथील भाजी मंडई मध्ये हा भाजीपाला हरास केल्या जातो वांगी, टोमॅटो, गोबी, पालक, सांभार, मेथी, मिरची वगैरे व वेगवेगळ्या जातीचा भाजीपाला हा चिखला मधून, घाण पाण्यामधून झालेल्या चिखलाच्या ठिकाणी हराशी केल्या जातो व तोच भाजीपाला शहरातील व तालुक्यातील सर्वच नागरीक खातात. हा भाजीपाला सर्वच नागरिकांच्या आरोग्यासाठी हानिकारक बनला आहे या गंभीर बाबीकडे येथील कृषी

उत्पन्न बाजार चे प्रशासन गांभीर्याने लक्ष देईल काय ? हा सर्व प्रकार पुसद शहरातील नागरिक उघड्या डोळ्यांनी पाहतात खेड्यापाड्यांतून आलेल्या शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला अशा घाणीच्या ठिकाणी टाकून हे मंडई वाले आपापले कमिशन घेऊन या भाजीपाल्याची कोणतीही सुव्यवस्था न करता घाणीच्या ठिकाणीच जमिनीवर टाकून हा भाजीपाला हरास केल्या जातो. त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी एक

 प्रकारचा चाललेला हा एक खेळच आहे. हा तात्काळ थांबावयास हवा या सर्व अतिशय गंभीर बाबींकडे कृषी उत्पन्न बाजार समितीने गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ या ठिकाणीचा भाजीपाला चांगल्या ठिकाणी व्यवस्था करून ठेवण्याची व्यवस्था करावी अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments