-->

Ads

बोरी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

(उमरखेड:ता.प्र.) 


दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी शुक्रवारला सायंकाळी चार वाजता बोरी(चा) ता. उमरखेड यवतमाळ येथील शेतकरी प्रकाश उत्तमराव माने यांच्या शेतात बैल चरत असताना अचानक परतीचा पाऊस पडला. त्याचबरोबर विजाचा कडकडाटात बैलावर वीज कोसळली त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाला. पावसाने कहर केला. सोयाबीन पिकाची अतोनात नुकसान झाले त्यामध्ये मेटाकुटीला आलेला शेतकरी आणि सर्वात महत्त्वाचे शेतकऱ्याचे संसाधन बैलजोडी त्यामध्येच बैलाचा मृत्यू झाल्यामुळे शेतकरी हातबल झाला. 

पुढील शेतीचे काम कसे करावे हा यक्षप्रश्न शेतकर्यां समोर उभा राहिला त्या बैलाची अंदाजे किंमत साठ हजार होती त्याची उणीव कशी भरून काढावी तर सर्वांचा मायबाप शासनच आहे.या बाबीकडे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकऱ्याकडून होत आहे याकडे उमरखेडचे शासनाचे प्रतिनिधी तहसीलदार साहेब यांनी लक्ष घालावे अशी विनंती बोरी येथील शेतकरी करत आहेत.

Post a Comment

0 Comments