रोहडा ते कुंभारीचा रस्ता ३कोटी २२ लाख रुपये खर्च करूनही दोन वर्षातच खड्डेमय.
प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर
तालुक्यातील माळपठारावरील रोहडा ते कुंभारी हा अंदाजे ४ कि. मी. रस्त्याची २ वर्षांतच दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ३ कोटी २१ लाख ९१ हजार रुपये खर्च करण्यात आले होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ह्या रस्त्याचे काम दि. ८ ऑगस्ट २०१८ ला सुरू करण्यात आले होते. हा रस्ता दि. ७ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्ण करून या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी १८ लाख १८ हजार रुपये ठेवण्यात आले होते. हा रस्ता बि. के. कंन्सस्ट्कशन कंपनी मार्फत डांबरीकरण
करण्यात आले होते. परंतु रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने करोडो रुपयांचा निधी वाया गेल्याचे वास्तव या निमित्ताने समोर आले आहे. रोहडा व कुंभारी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह गावकाऱ्यांकडून रस्त्याचे बांधकाम पुन्हा करण्याची मागणी सध्या जोर धरत आहे. रोहडा गावची लोकसंख्या जवळपास ४ ते ५००० हजार असुन ९ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. तर कुंभारी गावची लोकसंख्या जवळपास २ हजार ५०० असून नऊ सदस्य असलेली ग्राम पंचायत आहे. रोहडा ते कुंभारी रस्त्याचे डांबरीकरण मुख्यमंत्री
ग्रामसडक योजनेतून करण्यात आले आहे. रोहडा ते कुंभारी पर्यंत चार किलोमीटरचा रस्ता आहे. रस्त्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत ३ कोटी २१ लाख ९१ हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर झाला होता. रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी पुसदच्या बीके कन्स्ट्रक्शनला ठेका देण्यात आला होता. डांबरीकरणाचे काम दि. ८ ऑगस्ट २०१८ ला सुरुवात करण्यात आले. तर रस्त्याची
काम दि. ७ ऑगस्ट २०१९ रोजी पूर्ण झाले. रस्त्याच्या देखभालीसाठी व दुरुस्तीसाठी १८ लाख १८ हजार रुपयांचा निधी पाच वर्षांकरिता राखीव ठेवण्यात आला होता.रस्त्याचे चांगल्या दर्जाचे काम झाल्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळचे कार्यकारी अभियंता दिले होते.परंतु रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट दर्जाच्या झाल्याने कार्यकारी अभियंत्याने कोणत्या आधारावर रस्त्याची काम योग्य झाले हा चौकशीचा विषय बनला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाचे प्रकल्प अर्थसहाय्य
यांच्यामार्फत करोडो रुपयांचा रस्त्याचा निधी कसा काय वळता केला हा देखील चौकशीचा विषय बनला आहे.कारण २ वर्षांतच रस्त्यात खड्डे पडण्यास सुरुवात झाली होती. तर ३ वर्षांतच रस्त्यासाठी वापरण्यात आलेले डांबर व मटेरियल गायब झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थ गेल्या तीन वर्षापासून ये जा करतांना मोठी कसरत करत आहेत. कुंभारी गावच्या ग्रामस्थांना चार
किलोमीटरचा एकच मुख्य रस्ता असल्यामुळे त्यांना ये-जा करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळेला तर अनेक वेळा अपघात झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत. त्यामुळे ज्या ठेकेदाराला रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम दिलेले आहे. त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून ते काम इतर ठेकेदाराला देऊन रस्त्याचे पुन्हा एकदा डांबरीकरण करावी अशी मागणी गावकऱ्याकडून जोर धरत आहे.
रस्त्याचे काम जिल्हा परिषदने करून द्यावे.
रोहडा ते कुंभारी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने रस्त्यात खड्डे पडलेले आहे. सोबतच रोहडा येथे नाल्या देखील नसल्यामुळे नाल्यातील सांडपाणी व घाण पाणी रस्त्यावर येत आहे.सोबतच नालीचा उतार वरच्या बाजूने काढून द्यावे. पाणी रस्त्यावर येत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
जि.प.बांधकाम विभागाने नालीचे बांधकाम करून द्यावे यासाठी तसा पत्रव्यवहार देखील केला आहे. जि. प.बांधकाम विभागाने रस्त्याचे डांबरीकरणाकडे लक्ष केंद्रित करावे.-रेखा नामदेव पायघण, सरपंच,रोहडा.
कुंभारी ते रोहडा पर्यंतचा एकमेव रस्ता असल्यामुळे गावकऱ्यांना व आम्हालाही ये-जा करतांना मोठी कसरत करावी लागत आहे. दळणवळणाचे इतर कुठलेही साधन नसल्याने जि. प. बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याची डांबरीकरण करून द्यावे.-अर्चना पवार, सरपंच,कुंभारी.
कोट
ह्या रस्ताची डागडुजी करावयाची आहे परंतु पावसाळ्यामुळे प्लांट बंद असल्याने काम चालू केले नाही. प्लांट सुरू होताच या रस्त्याची दुरुस्ती केली जाईल.
सय्यद सीराज
अभियंता,
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना
0 Comments