-->

Ads

पुसद येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा जयंती जल्लोषात व सर्व समावेशक करण्यासाठी बैठक संपन्न

महामानवांचे विचाराच्या पेरणीसाठी बिरसा पर्वा चे आयोजनाचा निर्णय 

बिरसा ब्रिगेडच्या पुढाकारात उत्सव साजरा करण्यासाठी सर्व आदिवासी संघटनेचा पाठिंबा


प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर

पुसद/ महामानव बिरसा मुंडा यांची 15 नोव्हेंबर ची जयंती आदिवासी संस्कृती दर्शक व समाजाचे एकता सोबतच बिरसा मुंडांचे विचार पेरण्याचे कार्य जयंती उत्सवातून होत असते परंतु मागील कोरोना काळामुळे अशा आयोजनात खंड पडला होता. त्यामुळे यावर्षीची जयंती मोठ्या थाटामाटाने उत्साहात जल्लोषात साजरी करण्यासाठी बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून मोठया प्रमाणात मागणी होत होती. त्यामुळे बिरसा ब्रिगेड च्या वतीने पुसद तालुक्यातील सर्व आदिवासी समाजासह सर्व संघटना पदाधिकारी समाजसेवक यांच्या बैठकीचे आयोजन ८ ऑक्टोंबर 2022 रोजी विश्राम गृह पुसद येथे करण्यात आले होते. आयोजनाची माहिती कळताच कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी समाज बांधवांनी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. बहुसंख्य आदिवासी बंधू-भगिनींच्या उपस्थितीमध्ये बिरसा ब्रिगेडच्या पुढाकाराने जयंतीच्या आयोजना संबंधी विचार मांडण्यात आले त्या विचारासी उपस्थित सर्व सामाजिक संघटना व आदिवासी समाज बंधू-भगिनींनी सहमती दिली. महामानव बिरसा मुंडा यांच्या जयंती सोबतच मागील काळात बिरसा ब्रिगेड च्या वतीने बिरसा पर्व आयोजन केले होते. तेच बिरसा पर्व पुन्हा सुरू करावे आदिवासी संस्कृती, अंधश्रद्धा अशा विविध विषयातून महामानवांचे विचार पेरण्याचे कार्य या पर्वातून व्हावे असे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या वतीने सूचना देण्यात आल्या.  

बिरसा ब्रिगेडचे विदर्भाध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांच्या नेतृत्वात बिरसा मुंडा जयंती व बिरसा पर्व घेण्यासंदर्भात सभेचे आयोजन केले होते. त्यामध्ये अध्यक्षस्थानी अक्रोट संघटनेचे अध्यक्ष भास्कर मुकाडे, तर मार्गदर्शक म्हणून आदिवासी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ.हरिभाऊ फुपाटे, आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ उपाध्यक्ष सुरेश धनवे, माजी जिल्हा परिषद सदस्य परसराम डवरे व गजानन उघडे, माजी पंचायत समिती सभापती माणिकराव मोहेकर,  किसन भुरके, बिरसा क्रांती दल चे अध्यक्ष दादाराव चिरंगे, सामाजिक कार्यकर्ते वसंत चिरमाडे, ब्रिगेडचे शहर अध्यक्ष राजू कळंबे, ब्रिगेडचे कार्याध्यक्ष गजानन भोगे, माजी पंचायत समिती सदस्य गजानन फोपसे, महिला बिरसा ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष सुनिता मळघणे, यांच्या मार्गदर्शक मंचावरील उपस्थिती मध्ये घेण्यात आली. 


 या सभेला विद्यार्थी बिरसा ब्रिगेड अध्यक्ष अक्षय व्यवहारे, युवराज भांगे, गुरुदास खंदारे, गोपीनाथ डालके, अशोक खंदारे, बबन तांबारे, हनुमान मेंढे, अशोक तडसे, पांडुरंग तांबारे, दीपक खापरकर, गजानन डाखोरे, पवन धनसकर, विनोद भांगे, देवानंद मोरे, माधव भांगे, विष्णू आढाव, निलेश देवतळे, अनिल डाखोरे, स्वप्नील झोलांडे, अजय झोलांडे, अमोल डाखोरे, लिंबाजी डाखोरे, कार्तिक डाखोरे, राम शेंबडे, ज्ञानेश्वर खुडे, शिवराज बर्गे ,शंकर झोलांडे, गजानन आढाव, बबन धुम्हारे ,दिलीप झोलांडे, आकाश झोलांडे, उल्हास धुमारे ,मंगल आढाव ,अशोक झोलांडे ,भगवान डाखोरे ,गोपाल झोलांडे ,आकाश झोलांडे, गुरुदत्त खुडे, युवराज झोलांडे ,सुदाम चिरांगे, रंगराव मेंढे ,प्रशांत खंदारे ,पंडित तांबारे ,राहुल नरमले ,नरेश बंदुके, अरुण बुरकुले ,शिवम डुकरे ,शुभम जवादे ,सुमित निर्मले ,संदेश मयेकर ,शंकर शेळके ,रोहन बंदुके, विशाल धुमारे ,कुणाल वंजारे, गोविंदा बुरकुले ,कैलास बंदुके ,अमोल मोहेकर ,बापूराव तांबारे ,संतोष बोडके ,केशव काळे ,सुखदेव असोले ,राजू डेंगळे ,विठ्ठल घावस,गजानन मेडके, भाऊराव बेले ,राजू कळंबे ,गणपत गवाळे ,विलास डाखोरे देवानंद ,विठ्ठल मिराशे ,राजू पेदेवाड, गजानन भांगे ,सखाराम इंगळे ,पांडुरंग मळघणे ,पुंजाजी खंदारे , शकुंतला खुळे मनीषा बेले उषा तर्फे ,लताबाई नांदे ,महानंदा वंजारे ,वंदना वानोळे, मधुरा धुमारे ,सुनीता जंगले ,मीना व्यवहारे ,कविता वाघमारे ,संगीता धनवे, पंचफुलाबाई तोरकड, रेखा भांगे ,सुनिता मळगणे, शांता बेले ,सविता धनवे, आकांक्षा बेले ,साधना डाखोरे, अनिता मुखाडे, गणेश भुजारे, अजय ढंगारे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते समाज बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ब्रिगेडचे अध्यक्ष मारोती भस्मे यांनी तर उपस्थितांचे आभार वसंता चिरमाडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments