-->

Ads

पुसद तालुक्यात जवळी येथे साहेब आमच्या गावाला एसटी चालू करा हो ! ,शाळेकरी विद्यार्थी व नागरिकांचा आक्रोश


पुसद प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मेटकर

मो. 9527308455

माळपठारा वरील आदिवासी बहुल 

 जवळी गावातील शाळकरी मुले आणि वृद्ध यांच्या येण्या जाण्यासाठी जवळी मार्गे एस. टी. बस सेवा चालू करा

मागील 6 वर्षापासून कोणतीही एस. टी. बस नसल्यामुळे गावातील नागरिकांना प्रवासाचा मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. तसेच शाळेतील विध्यार्थ्यांना एस. टी. नसल्यामुळे शाळेत जाण्या येण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे पुसद ते जवळी नानंद बस चालू करण्यात यावी . तसेच फेट्रा, मोप, होरकड येथे जाणाऱ्या एस टी बस जवळी मार्गे चालविण्यात यावी. जेणे करुन गावातील प्रवासी नागरिकांची व शाळेतील विध्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही. याकरिता उपसरपंच व गावकरी मंडळी ग्रा. पं. जवळी ता. पुसद येथील नागरिक यांनी आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुसद यांना निवेदन देऊन विद्यार्थी व नागरिकांचे गैरसोय होऊ नये म्हणून त्वरित बस सेवा सुरू करावी अशी या निवेदनाद्वारे विनंती केली आहे या निवेदनावर 60 ते 65 विद्यार्थी नागरिक आणि रोज अपडाऊन करणारे प्रवासी यानी राजू इंगळे उपसरपंच, रामेश्वर सिताराम चिरोली पोलीस पाटील, विनोद चिरमाडे, कृष्णा पांडे, सुदर्शन धनवे, विठ्ठल चिरमाडे, घनश्याम डाखोरे, आकाश आढाव, युवराज लाखाडे, कमलाबाई पांडे, लक्ष्मीबाई बालगीते, रूपाबाई इंगळे, यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले

Post a Comment

0 Comments