-->

Ads

कारसाठी 21 वर्षीय तरुणाने कुटुंब टाकलं धोक्यात; आता खातोय तुरुंगाची हवा

  

राजधानी दिल्लीतून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. एका 21 वर्षीय तरुणाने कार मिळवण्यासाठी स्वत:च्या जीवसह कुटुंबाला धोक्यात टाकलं आहे. या घटनेनंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 21 वर्षी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचं कारस्थान रचलं. यासाठी त्याने आपल्या वडिलांकडून 2 लाख रुपये काढण्याचा प्लान केला.

दिल्लीच्या नजफगडमध्ये राहणारा आरोपी एका खासगी कंपनीत डिलिव्हरी बॉयचं काम करतो. प्रेमचंदला एक कार खरेदी करण्याची इच्छा होती. कार खरेदी करून ती कॅब म्हणून चालवण्यासाठी तो प्रयत्न करीत होता. मात्र पैशांची जुळवाजुळव होत नव्हती. यानंतर त्याने स्वत:चच अपहरण करण्याचा प्लान आखला. 12 ऑक्टोबर रोजी स्वत:चं अपहरण करून त्याने घरी पैशांसाठी फोन करण्यास सांगितला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वत:चं अपहरण केल्यानंतर आरोपीने आपल्या घरी फोन केला, अपहरण झाल्याचं सांगितलं. त्यांनी कुटुंबाकडून 2 लाखांची मागणी केली. कुटुंबीयांनी पोलिसात घडलेला प्रकार सांगितला. फोन ट्रेस करून पोलीस घटनास्थळी पोहोचले. येथे आरोपीची मोटरसायकल होती. पोलिसांनी आरोपीबरोबरच त्याच्यासोबतच्या काही अटक केली आहे.

प्रेमचंदने पोलिसांना सांगितलं की, त्याला कार खरेदी करायची होती. आणि टॅक्सीचं काम सुरू करायचं होतं. यासाठी त्याने स्वत:च्याच अपहरणाचं कारस्थान रचलं. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments