पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीमधील इमारत क्रमांक 15 बी मध्ये ही घटना घडली आहे. सुनील नायडू (वय 19) असं मृत तरुणाचं नाव आहे. या इमारतीजवळ काही तरुण फटाके फोडत होते. यामध्ये सुनील नायडूचा सुद्धा समावेश होता.
सुनील आणि त्याचे मित्र हे एका काचेच्या बॉटलमध्ये रॉकेट आणि इतर फटाके फोडत होता. पण, तिथे उपस्थितीत असलेल्या एका 13 वर्षीय आकाश शिंदे नावाच्या मुलासोबत वाद झाला होता. त्याने त्याला फटाके फोडण्यापासून रोखले. पण, दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीमध्ये झाले. पण, त्याच वेळी आकाश शिंदे यांचा 14 वर्षांचा भाऊ तिथेच उभा होता. त्याने रागाच्या भरात सुनीलच्या मानेवर चाकूने वार केला. त्यामुळे सुनीलला गंभीर दुखापत झाली. रक्ताच्या थारोळ्यात तो घराकडे पळत सुटला.
त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांनी त्याला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. सुनीलच्या कुटुंबीयांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
0 Comments