-->

Ads

पुणे: बुधवार पेठेत जायचा अन् दरवेळी 1 दुचाकी चोरायचा; अखेर 6 महिन्यांनंतर अशी झाली पोलखोल

 


 पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट एरिया हा खूप प्रसिद्ध असून या भागात हजारोच्या संख्येने  नागरिक येत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून देहू रोड परिसरात राहणारा एक युवक दररोज इथे यायचा. इथे आल्यानंतर तो या परिसरात उभा असलेल्या दुचाकी चोरून नेत होता. फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या सहा महिन्यांपासून वाहन चोरीचं प्रमाण वाढलं होतं. हा तरुण बुधवार पेठेत जायचा. आपल्या मैञिणीलाही भेटायचा पण जाताना मात्र हमखास एक बाईक चोरून न्यायचाच.

ही वाहन चोरी रोखणं हे पोलिसांसमोर एक आव्हान बनलं होतं. या वाहन चोरीला आळा घालण्यासाठी फरासखाना पोलिसांकडून या दुचाकी चोरी झालेल्या भागातील CCTV कॅमेरे पाहून आरोपीचा शोध घेण्यात सुरुवात झाली. मग पोलिसांनी एक-दोन नव्हे तर तब्बल अडीचशेहून अधिक CCTV फुटेज पाहून या दुचाकी चोरणाऱ्या सराईतांकडून तब्बल 16 मोटारसायकली जप्त केल्या आहेत.

सोहेल युनुस शेख, (वय २६ वर्षे) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून चोरीच्या ४,४०,००० रुपये किमतीच्या १६ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या असून त्याचे 17 गुन्हे उघडकीस आले आहेत. याबाबत अधिकची माहिती अशी की आरोपी सोहेल शेख हा अधूनमधून पुण्यातील बुधवार पेठ येथील रेड लाईट भागात येत होता. तिथं आल्यावर परिसरात लावण्यात आलेल्या दुचाकी तो चोरून घेऊन जात होता.

गेल्या सहा महिन्यात फरासखाना परिसरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांचीही डोकेदुखी वाढली होती. अशातच पोलिसांकडून बुधवार पेठ परिसरातील सीसीटीव्ही तपास सुरू झाला. फरासखाना पोलीस स्टेशनचे अंमलदार वैभव स्वामी आणि प्रविण पासलकर यांनी मोटारसायकल चोरी झालेल्या ठिकाणापासून ते देहुरोडपर्यंत आठ दिवसाच्या कालावधीत तब्बल 150 ते 200 CCTV कॅमेरे चेक केले.

यात भक्ती शक्ती चौकापर्यंत मोटारसायकल चोराचे CCTV फुटेज प्राप्त झाले . परंतु तिथुन पुढे आरोपी कुठे गेला? याबाबत काहीच माहिती मिळत नव्हती. पण त्यांनतर परिसरात पेट्रोलिंग करत असताना हा आरोपी एक दुचाकी घेऊन जाताना दिसला. त्याची चौकशी केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या ४,४०,००० रुपये किमतीच्या १६ मोटारसायकल जप्त केल्या गेल्या, अशी माहिती परिमंडळ 1 च्या पोलीस उपआयुक्त डॉ.प्रियांका नारनवरे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments