प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर मेटकर
पुसद : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अतिक्रमण काढून पुतळ्याच्या सौंदर्यीकरण करण्यात यावे यासाठी दि.१५/०९/२०२२ ला उपविभागीय अधिकारी पुसद यांना विविध पक्ष व सामाजिक संघटनां मार्फत निवेदन देऊन दखल घेण्याची मागणी केली होती. पण त्या निवेदनामध्ये दि.२८/०९/२०२२ ला रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे नमूद केले होते त्या अनुषंगाने आज दि.२६/०९/२०२२ ला सकाळी ११:३० वाजता विश्रामगृह पुसद येथे एकूण २० ते २२राजकीय पक्ष व सामाजिक संघटना यांनी मिळून दि .२८ सप्टेंबरला होणाऱ्या रस्ता रोको आंदोलनाच्या नियोजनासाठी बैठक घेऊन होणारे रस्ता रोको आंदोलन हे लोकशाही मार्गाने करून आणि पुढेही प्रशासनाने अतिक्रमण हटून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे सुशोभीकरण न केल्यास वेळ आली तर जेल भरो आंदोलनही करू अशी ग्वाही या बैठकीत घेण्यात आली यावेळी उपस्थित संघटना..
चौकट......
२२ पक्ष व सामाजिक संघटनेचा एल्गार
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले, भीम टायगर सेना, बिरसा मुंडा ब्रिगेड, शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, एम आय एम पक्ष, लहुजी शक्ती सेना,अखिल भारतीय आदिवासी युवा परिषद, संवाद सरपंच संघटना, ग्रामीण पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्य पुसद, गोर सेना, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भिम बॉईज ग्रुप, माणुसकीची भिंत, मातृभूमी फाउंडेशन,बहुजन क्रांती मोर्चा, मुव्हमेंट फॉर पिस अँड जस्टीस पुसद, तांडा सुधार समिती पुसद, इत्यादी समाज संघटना व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments