कठोर मेहनत यशाचे गमक - राजेश पंडित
(शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम )
वैश्विक विकास संस्था , मुळावा व कट्स इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने शेयरिंग कम्युनिटी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे या अंतर्गत वस्तूंचे आदान प्रदान व्हावे , गरजूना त्याचा फायदा व्हावा या उद्दात हेतूने , आपल्या पर्यावरणाचे रक्षण करता यावे यासाठी या नावीन्यपूर्ण उपक्रमाची सुरवात करण्यात आली. , असून यात जगातील वेगवेगळ्या देशात हा उपक्रम सुरु आहे. भारतात 14 राज्यात सदर उपक्रम सुरु असून त्यात महाराष्ट्र राज्यात वैश्विक विकास संस्था मुळावा सदर उपक्रम राबवीत आहे.
शेयरिंग कम्युनिटी या प्रकल्पाअंतर्गत जिल्हा परिषद शाळा , मोहदरी येथील विद्यार्थीना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्याना नोटबुक , पेन , व इतर साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैश्विक विकास संस्था मुळावाचे अध्यक्ष अजय झरकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पोफळी पोलीस स्टेशन चे पीएसआय राजेश पंडित , लेखन जाधव उपस्थित होते . या कार्यक्रमास रत्नाकर अडकिने ,शुभम शिलोनेकर , शब्बीर भाई कुरेशी , रमेश ढोबळे , बंडूभाऊ कदम , ओंकार देशमुख , दता गंगाले , सय्यद रेहान , यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र पाटील यांनी केले तर आभार शाळेचे मुख्याध्यापक संभाजी पुंडे यांनी मानले.
0 Comments