प्रतिनिधी ,:-ज्ञानेश्वर मेटकर
3D न्यूज पुसद
पुसद : वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दिग्रस रोडवर मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ,हा
अपघात की घातपात?अशी संशयास्पद परिस्थिती आहे
त्याबाबत सविस्तर असे की पुसद शहरातील वसंत नगर येथील, मुजाहिद खान हमीद खान,वय अंदाजे ४० वर्ष या इसमाचा काल दि.१८/०९/२०२२ रोजी संध्याकाळी ७ वाजता च्या सुमारास सदर ठिकाणी मृतदेह आढळून आला आहे, सदर प्रकरणाची माहिती मिळताच वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धाळवे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता सदर व्यक्तीच्या डोक्यावर मागील बाजूस मार लागल्याने व घटनास्थळी मोटरसायकलचा डोम तुटफूट झालेल्या अवस्थेत आढळून आल्याने सदर प्रकरण हे अपघातच असावा अशी आशंका व्यक्त करण्यात आली आहे परंतु, जोपर्यंत पूर्णपणे चौकशी होत नाही तोपर्यंत सदर प्रकरण हे अपघात की घातपात, हा प्रश्न कायमच असल्याने सदर प्रकरण हे पुढील तपासातच उघडकीस येईल असा खुलासा संबंधित पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे, मृतक मुजाहिद खान हमीद खान यांच्या मागे पत्नी आई-वडील एक मुलगा व एक लहान भाऊ असा परिवार आहे. त्यामुळे परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सदर प्रकरणी वसंत नगर पोलीस स्टेशन पोलीस चे पोलीस निरीक्षक नाचनकर यांचा मार्गदर्शन मध्ये कार्यवाही करीत आहे. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह हे शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आला असून पोलिसांत आकस्मिक मुर्त्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments