-->

Ads

सावधान! तुम्हालाही कारमध्ये मौल्यवान वस्तू ठेवण्याची सवय? पुण्यातून समोर आली धक्कादायक घटना


गणेश दुडम,
 पुणे 19 सप्टेंबर : चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. कधी घरफोडी करून तर कधी अगदी गर्दीच्या ठिकाणी हातचालाखी दाखवत चोरी केल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आता चोरीची आणखी एक घटना मावळमधून समोर आली आहे. यात गहुंजे परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधील कारमधून दोन लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली आहे.

अनेकदा आपण आपली कार अतिशय सुरक्षित असल्याचं समजून गाडी लॉक करून त्यामध्येच मौल्यवान वस्तू ठेवून फिरायला जात असतो. अनेकदा तर घराजवळ असलेल्या पार्किंगमध्ये कार लावली जाते आणि आतील वस्तू तशाच ठेवल्या जातात. मात्र, आता जी घटना समोर आली ती वाचल्यानंतर गाडीमध्ये मौल्यवान वस्तू ठेवून जाण्याआधी तुम्हीही दहावेळा विचार कराल.

या घटनेत मावळातील गहुंजे परिसरात सोसायटीच्या पार्किंगमधील कारमधून दोन लाखांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केली. लोढा सोसायटीच्या पार्किंगमध्ये प्रविणकुमार सिंह यांनी कार पार्किंग केली होती. यावेळी अज्ञात चोरट्याने कारमधील दोन लाख रुपये चोरून पोबारा केला. याबाबत प्रविणकुमार यांनी शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस सध्या अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची मर्सिडीज कार सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. त्यांनी कारमध्ये दोन लाख 10 हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गाडीतून रोकड चोरून नेली आहे. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments