-->

Ads

महागाव तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर कारखाना परिसरात आढळले नवजात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत

महागाव  तालुक्यातील गुंज येथील नॅचरल शुगर कारखाना परिसरात आज गुरुवार सकाळी १० : ० वाजल्याच्या सुमारास एक नवजात स्त्री जातीचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती . ही घटना वाऱ्यासारखी परिसरात पसरल्याने बघ्याची एकच गर्दी झाली होती . 



प्रतिनिधी:- ज्ञानेश्वर मेटकर

याबाबत माहिती आशि की , आज सकाळी गुंज येथील नॅचरल शुगर कारखाना परिसरातील सवना ते गुंज दरम्यान एक नवजात स्त्री जातीचे अर्भक डोळ्यात कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत बेवारस स्थितीत आढळून कारखान्याच्या सुरक्षा रक्षकाला व रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना दिसून आले . त्यांनी लगेच गुंज येथील पोलीस पाटील तुकाराम भो यांना माहिती दिली .त्यावेळी पोलीस पाटलांनी तात्काळ महागाव पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला . अर्भकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला . या प्रकरणी पोलीस पाटील यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध भादंवि ३१८ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे परंतु या घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना कडक शिक्षा करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments