पुसद तालुक्यातील फेट्रा येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा पुसदच्या वतीने दि.१९ सप्टेंबर २०२२ रोजी डॉ. सौ.आरतीताई फुपाटे यांच्या पुढाकाराने मोफत सिकलसेल ऍनिमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सविस्तर माहिती अशी की, भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पुसद तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचअनुषंगाने १९ सप्टेंबर २०२२ रोजी या सेवा पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवशी पुसद तालुक्यातील फेट्रा येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चा पुसदच्या वतीने मोफत सिकलसेल
एनिमिया तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या माध्यमातून फेट्रा PHC परिसरातील २०० नागरिकांची सिकलसेल ऍनिमिया मोफत तपासणी करण्यात आली. त्यापैकी चार जण पॉझिटिव्ह निघाले आहेत याप्रसंगी आ.ॲड.निलयभाऊ नाईक विधानपरिषद सदस्य यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले तसेच यावेळी डॉ.सौ.आरतीताई फुपाटे यांनी उपस्थित विद्यार्थिनी व महिला ; पुरुष नागरिकांना सिकलसेल ऍनिमिया संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. या शिबिराला अविभाऊ देशमुख, निळुभाऊ पाटील ,भाजपा तालुका अध्यक्ष नंदू भाऊ काळे , पंजाब भोयर, आणि प्रतिक पाटील उपस्थित होते.
तसेच सौ.सुशिलाबाई कुरुडे (सरपंच फेट्रा ) मोतीराम राठोड ,प्रकाश चव्हाण (आमटी) ,विवेकराव मस्के माजी प स उपसभापती,अर्जुनभाऊ कुरुडे (माजी सरपंच फेट्रा), नंदेशकुमार सवळे (सरपंच मोप), राजू कोकरे (माजी पंचायत समिती सदस्य) ,बाळू मिरटकर (सरपंच होरकड), देवराव जाधव (सत्तरमाळ), (हेमंत माने पन्हाळा) , अशोक सवळे, प्रदीपराव नाईक, दौलतराव मस्के ,दुर्गादास महाराज पवार, मधुकर बुरकुले (खैरखेडा), सचिन भिसे , गोविंदराव खुडे , गोरखनाथ कपाटे, दत्ता बेले व तसेच परिसरातील व गावातील इतर नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाची यशस्वी आयोजन डॉ.सौ.आरतीताई फुपाटे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.शरद ताटेवार MO,
डॉ.नामदेव सरकुंडे MO ,व फेट्रा PHC येथील कर्मचाऱ्यांनी केली.
तसेच यावेळी फेट्रा गावातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख अजगर शेख अब्बास यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.नामदेव सरकुंडे यांनी केले. या शिबिरा साठी परिश्रम प्रतीक पाटील, स्वप्निल महोरे आणि स्वप्निल इंगळे यांनी केले.
0 Comments