-->

Ads

पुसद तालुक्यातील चिकणी शिवारातील पुस नदीच्या पात्रामध्ये आढळला मृतदेह


पुसद : तालुक्यातील चिकणी शिवारातील पुस नदीच्या पात्रामध्ये देवी वार्ड येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह दि . १५ सप्टेंबर २०२२ रोजीच्या सकाळी १० वाजताच्या दरम्यान आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे . तो तीन दिवसांपूर्वीच घरी कोणालाही न सांगता निघून गेला होता . त्याच्या नातेवाईकांनी हरपला असल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली होती . त्याचा शोध पोलिसांकडून घेतल्या जात असताना मृतदेह आढळला आहे . उमेश बापुराव सिद्दमसेटवार वय ४४ वर्षे रा . देवी वार्ड असे मृत इसमाचे नाव आहे . देवी वार्ड येथे राहणारा उमेश दि . १२ सप्टेंबर २०२२ रोजी घरी कोणालाही न सांगता निघून गेला होता . त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता कुठेही सापडला नाही . शेवटी त्याच्या नातेवाईकांनी शहर पोलीस स्टेशनमध्ये उमेश हरवल्याची तक्रार दिली . शहर पोलीस स्टेशनकडून उमेशचा शोध घेणे सुरू असताना त्याचा मृतदेह खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चिकणी शिवारातील पूस नदीच्या पात्रात तरंगताना गावच्या सरपंचांना आढळून आला आहे .त्यानंतर गावच्या सरपंचांने खंडाळा पोलीस स्टेशनला मृतदेह आढळल्याची माहिती दिली असता खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल सेंगेपल्लु , आनंद शेळके , गजानन फोपसे , धम्मपाल केवटे व श्याम घुगे यांनी घटनास्थळ गाठून गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला व पंचनामा केला व मृतदेह उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनाकरिता दाखल करण्यात आला आहे .


प्रतिनिधी :- ज्ञानेश्वर मेटकर 3D न्यूज पुसद

 मृतदेह आढळल्या प्रकरणी गावच्या सरपंचाने खंडाळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे . तो गेल्या काही दिवसापासून मानसिक तणावात होता अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे . उमेशच्या पश्चात पत्नी मुलबाळसह मोठा आप्त परिवार आहे .

Post a Comment

0 Comments