महागाव प्रतिनिधी:- संजय जाधव
फुलसावंगी ( दि २२ ) येथील वाघू शेषराव रणमले हा ४५ वर्षीय इसम ११ सप्टेंबरला नाल्याच्या पुरात वाहून गेला होता बुधवार १६ सप्टेंबर ला त्याचे प्रेत पैनगंगा नदी पत्रात,वाहून गेलेल्या ठिकाणापासून जवळपास २२५ किमी अंतरावर येडशी ता,झरी जामणी येथे कुजलेल्या अवस्थेत आढळले,येडशी येथील पोलीस पाटलाच्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी बेवारस प्रेताचे सरकारी सोपस्कार पूर्ण करून घट्ना स्थलावर अंत्यविधी पार पडला मुकुटबन पोलीस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष ठाणेदार अजित जाधव, पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, बिट जमादार गजानन भांदककर,सह येडशी चे पोलीस पाटील आणि गावकऱ्यांनी व बिट जमादार अनिल सकवान,पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांनी बेवारस प्रेतावर हिंदू रीतिरिवाजा नुसार अंत्यसंस्कार पार पाडले
हे वृत्त एका वृत्तपत्रात पहिल्या नंतर फुलसावंगीचे मृत व्यक्तीचे नातेवाईक गेले असता त्यांना अंत्यविधीची जागा दाखवून यथायोग्य मार्गदर्शन करून पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यावर तुमच्या घरी पाठवितो असे सांगून त्यांचे सांत्वन केले पोलीसांच्या या चांगल्या वागणुकी बदल फुलसावंगीच्या नागरिकांनी कृतज्ञता व्यक्त केली यावेळी उपस्थित रामकीसन मुळे, कचरू खरात,सह मृतकाचे पत्नी, मुलगा,मुलगी, बहीण सह नातेवाईक उपस्थित होते
0 Comments