-->

Ads

फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत शिक्षक देण्याची मागणी


यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत एकूण १३ शिक्षकांची पदे मंजूर असतांना सध्या शाळेवर ६ शिक्षक कार्यरत आहेत येथे वर्ग १ ते ८ पर्यंत आहे येथील विद्यार्थ्यांनची  पट संख्या ३४५ असून यवतमाळ जिल्ह्यातील पट संख्यानुसार या उर्दू शाळेचा पहिला क्रमांक लागतो पण अनेक दिवसांपासून शिक्षकांची रिक्त पदे असल्यामुळे विद्यार्थ्यांना चे शैक्षणिक नुकसान होत आहे या होत असलेल्या विद्यार्थ्यांना चे नुकसानामुळे पालकांचा कल कन्व्हेंट कडे  वडू लागला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चा शैक्षणिक नुकसान शिक्षकांच्या रिक्त पदा मुळे होत आहे कर्व्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्री कृष्ण पांचाळ साहेब व प्राथमिक शिक्षण अधिकारी प्रमोद सूर्यवंशी साहेबांनी जातीने लक्ष घालून उर्दू प्राथमिक शाळेवर शिक्षक देऊन होत असलेल्या विद्यार्थ्यांना चे शैक्षणिक नुकसान थांबविण्यात यावे अशी निवेदनातुन मागणी करण्यात आली यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिस शेख उप अध्यक्ष आयुब शेख,शेख जमन सदस्य, बाबू खान पठाण तंटामुक्ती अध्यक्ष हे उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments