राज्यात हत्या, बलात्कार, आत्महत्या यांसारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येक दिवशी राज्यातील विविध भागात याप्रकारच्या घटना घडत असल्याचे दिसत आहे. आता बदलापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढदिवसाच्या दिवशी एकाची हत्या करण्यात आली.
मित्रा-मित्रांमध्ये झालेल्या भांडणात शुभम मोरे या तरुणाची हत्या झाली. ही घटना बदलापुरातील सर्वांत वर्दळ असलेल्या कात्रज चौकात घडली. याप्रकरणी बदलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्याची हत्या झाली आहे त्याच्या भावाचा त्याच दिवशी वाढदिवस होता. यामुळे वाढदिवसाची पार्टी साजरी करूनच ते घरी परतत असताना ही धक्कादायक घटना घडली.शुभम मोरे याचा भाऊ शिवम मोरे याचा 15 सप्टेंबरला वाढदिवस होता. त्यामुळे वाढदिवसाची पार्टी करून तो आणि त्याचा भाऊ शुभम कात्रज चौकात आले होते. याचदरम्यान, याठिकाणी शिवम याचा दुसरा मित्र विशाल आणि पुष्कर धुळे हे दोन्ही तिथे आले. यावेळी मित्रा-मित्रांमध्ये वादावादी झाली आणि यानंतर हाणामारी सुरू झाली. पुष्कर धुळे याने शिवम याला मारहाण करण्यास सुरुवात केल्यामुळे शिवमचा मोठा भाऊ शुभम भांडण सोडवू लागला.
मात्र, पुष्करने त्याचे न ऐकता शुभमलाही मारहाण केली. त्यात पुष्कर याच्या हाताचा कोपरा शुभमच्या छातीला जोरदार लागल्याने शुभमचा मृत्यू झाला. यानंतर शिवमच्या बदलापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पुष्कर धुळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मीरा भाईंदरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात एका महिलेनं आपल्या सहा वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या टेरेसवरुन उडी घेतली. या घटनेत दोघींचाही मृत्यू झाला आहे. ही महिला काशी मीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौरव गॅलक्सी, नित्यानंद नगर शांती गार्डन परिसरात राहात होती. महिलेनं आपल्या मुलीसह टेरेसवरुन उडी मारत आत्महत्या केली आहे.
0 Comments