यवतमाळ प्रतिनिधी:- संजय जाधव
यवतमाळ : जुन्या वादाच्या कारणातून मारेकऱ्याने चक्क पोलिस मुख्यालयात जाऊन पोलिस कर्मचाऱ्याचा खून केला. यवतमाळच्या अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे. निशांत खडसे, असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. तो कामानिमित्त पोलीस मुख्यालय येथे आले असता अनोळखी मारेकरी अचानक पोलिस मुख्यालय गेट जवळ आले आणि खून केला. घटनेची माहिती मिळताच अवधुतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू आहे.
0 Comments