-->

Ads

बुलढाण्यातले शातिर चोर, ज्वेलर्सच्या दुकानात भामट्यांचा हात, पाहा VIDEO


  खामगावमध्ये एका ज्वेलर्सच्या दुकानात दोन चोरट्यांनी दुकानदार महिलेची नजर चुकवत 98 हजारांचे दागिने लंपास केले आहेत. आरोपींचा प्रताप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खरंतर आरोपी दुकानात शिरले तेव्हा त्यांनी दुकानदार महिलेला बोलण्यात गुंतवलं. त्यांनी महिलेला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दाखवण्यास सांगितले. या दरम्यान त्यांनी संधी साधत दागिने चोरले. त्यानंतर ते कोणतेही दागिने न घेता निघून गेले. आरोपी पळून गेल्यानंतर त्यांनी चोरी केल्याचं उघड झालं.

सोन्याच्या दुकानात ग्राहक बनून आलेल्या दोघांनी दुकानदार महिलेची नजर चुकवीत 98 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना खामगावच्या सती ज्वलर्समध्ये घडली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. खामगावच्या सती ज्वलर्समध्ये निर्मला वर्मा या असताना 2 भामटे दुकानात शिरले. त्यांनी विविध प्रकारचे सोन्याचे दागिने बघितले.

महिला दुकानदार यांचं लक्ष विचलित करून या 2 भामट्यांनी चक्क 98 हजाराचे सोन्याचे दागिने चोरले आणि तेथून काहीच न घेता निघून गेले. नंतर महिला दुकानदाराला चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आला. त्यावेळी त्यांनी दुकानात लावलेले सीसीटीव्ही तपासून पाहिले. तर त्यामध्ये सोन्याचे दागिने चोरतांना हे 2 भामटे आढळले. त्यावरून शहर पोलिसात अज्ञात आरोपींविरुद्ध तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारावर चोरट्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशाच एका चोरीचा प्रकार समोर आला आहे. देवगड तळेबाजार येथे रिक्षा भाड्याने करून घेऊन जात तरळे येथील रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन सोन्याच्या दागिने, रोख रकमेसह एकूण 84500 रुपयांचा मुद्देमाल एका जोडप्याने लुटल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकरणी कणकवली पोलिसात संशयित जोडप्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या प्रकाराने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. भर दिवसा घडणाऱ्या अशा धाडसी प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालंय. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Post a Comment

0 Comments