-->

Ads

अंकिताने वेश्याव्यवसायास दिला नकार, 5 दिवसांपासून बेपत्ता तरुणीचा भयंकर शेवट


 उत्तराखंडच्या ऋषिकेशमधून पाच दिवसांपासून बेपत्ता अंकिता भंडारीच्या हत्येवरुन जनतेमध्ये जबरदस्त आक्रोश आहे. शनिवारी ऋषिकेश एम्समध्ये अंकिता भंडारी हिच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. पाच दिवसांपासून अंकिता घरातून बेपत्ता झाली होती. पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंकिता भंडारीची चिला कालव्यात ढकलून हत्या करण्यात आली होती. याचा खुलासा करून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून रिसॉर्टचा संचालक पुलकित आर्य आणि त्याचे दोन व्यवस्थापक, माजी राज्यमंत्र्यांचा मुलगा, रिसॉर्टचालक यांना अटक केली आहे.

शनिवारी सकाळी अंकिताचा मृतदेह सापडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी या प्रकरणाचा खुलासा करताना सांगितलं की, अंकिता वनंत्रा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत होती. 18 सप्टेंबर रोजी ती अत्यंत रहस्यमय पद्धतीने बेपत्ता झाली. या घटनेनंतर रिसॉर्टचा माल पुलकित आर्यने अंकिता बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल केला.  गुरुवारपर्यंत अंकिताबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी या प्रकरणात तपास केला तर मॅनेजरबद्दल संशय निर्माण झाला. रेसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली तर कळालं की, 18 सप्टेंबरच्या सायंकाळी 8 वाजेपर्यंत अंकिता रेसॉर्टचा मालक पुलकित आर्य, मॅनेजर अंकित आणि भास्करसह रेसॉर्टमधून गेली होती. यानंतर 10 वाजता तिघे रेसॉर्टवर परतले. अंकिता त्यांच्यासोबत नव्हती. यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. शेवटी त्यांनी आपला गुन्हा कबुल केला.

आरोपी अंकिताला तेथे येणाऱ्या ग्राहकांसह शरीर संबंध ठेवण्यास जबरदस्ती करीत होते. हे अंकिताने अनेकांना सांगितलं होतं. ती अनेकदा रेसॉर्टचं सत्य सर्वांसमोर आणण्याची धमकी देत होती. त्या दिवशी तिघेजण तिला घेऊन बाहेर गेले. त्यांनी दारू प्यायली, यानंतर एका कालव्याजवळ त्यांनी कार थांबवली. येथे अंकिता आणि पुलकितमध्ये भांडण झालं. यात अंकिताने पुलकितचा मोबाइल फोन खेचून कालव्यात टाकला. यानंतर संतापलेल्या पुलकितने अंकिताला कालव्यात ढकललं. अंकिताने बचावासाठी मदत मागितली, मात्र तिघे घाबरून पळून गेले.

Post a Comment

0 Comments