-->

Ads

जळगावात मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी, 5 दिवसात तब्बल इतक्या दुचाकी जप्त

 विशेषत: शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते






    जळगाव, 17 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. आता जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरी रोखण्यासाठी पोलीस परिश्रम घेत आहेत. तीन दिवसापूर्वीच जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दुचाकी चोरट्याला पकडले होते.

    या चोरट्याकडून चोरीच्या तब्बल 11 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या होत्या. दरम्यान, दोन दिवसानंतर पुन्हा एकाला पकडण्यात आले असून त्याच्याकडून 15 चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. जळगांव शहर पोलीस स्टेशन हद्दीत जळगांव जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची खरेदीसाठी खुप गर्दी होत असते. गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी नागरिकांच्या मोटरसायकल चोरण्याचा धडाकाच लावला होता.

    विशेषत: शहरातील मुख्य मार्केट भागात चोरीचे प्रमाण खुप वाढले होते. यावेळी शहर पोलीस ठाण्याचे पथक वारंवार मोटरसायकल चोरीच्या ठिकाणावर पथकाकडून सापळा लावून गेल्या दोन-तीन महिन्यापासून पथक आरोपीच्या मागावर होते. गेल्या काही महिन्यांपासुन मागावर असलेल्या पथकाला अखेर यश आले आहे. पोलिसांना आरोपी दुचाकी चोरीसाठी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे पुर्वीच सापळा लावून बसलेल्या पथकाने चोरट्याला पकडले. रोहीत तुळशीराम कोळी असे चोरट्याचे नाव आहे. आरोपी चोरट्याने दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

    आतापर्यंत 15 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा एक साथीदार फरार आहे. त्यानेही बऱ्याच दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. तर याआधी आरोपी पवन प्रेमचंद पाटील या आरोपीकडून 11 मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. याप्रकारे मागील पाच दिवसामध्ये जळगांव शहर पोलीस पथकाने एकूण 26 मोटरसायकल जप्त केल्या आहेत.

    Post a Comment

    0 Comments