-->

Ads

चंद्रपूर हादरलं, एकाच कुटुंबातील 4 जणांचा आत्महत्येचा प्रयत्न, आईचा मृत्यू

 


चंद्रपूर, 26 सप्टेंबर : चंद्रपूरमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. तिघांना तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी शहरातील सहकार कॉलनी इथं ही घटना घडली आहे. रमाकांत दामोधर ठाकरे (५५), गीता रमाकांत ठाकरे (५०) राहुल रमाकांत ठाकरे (२८) आणि मनोज रमाकांत ठाकरे (२६) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची नावं आहे.

उपचारादरम्यान गीता ठाकरे यांचा मृत्यू झाला आहे. तर इतरांवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. रविवारी रात्री या सर्वांनी तणनाशक पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक चणचणीच्या कारणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ब्रम्हपुरी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, पत्नीने आपल्याच डॉक्टर पतीला अनैतिक संबंधातून आपल्या दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने भुलीचे इंजेक्शन टोचून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातीलच एका खोलीत हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने म्हसरूळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर रविवारी ही धक्कादायक उघडकीस आली.

नाशिक येथील एका खासगी रुग्णालयातील 45 वर्षीय पीडित डॉक्टरला त्याच्या 40 वर्षीय पत्नीने आपल्या प्रियकरासोबत मिळून संगनमताने रुग्णालयात बोलावले आणि याठिकाणी वाद घातला. यानंतर डॉक्टरला दोघांनी मिळून रुग्णालयातीलच एका खोलीत डांबले. आणि तेथे त्यांना इंजेक्शनद्वारे भुलीच्या औषध देत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित महिला व तिच्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. म्हसरुळ पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला


Post a Comment

0 Comments