भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. देशभरातील 75 शाळेतील 750 विद्यार्थ्यांनी आझादी सेट हा उपगृह तयार केला
इस्त्रोच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्त्रोने स्मॉल सॅटेलाइट लाँच व्हेईकल डेवलपमेंटल फ्लाइट-1 (SSLV-D1) चे प्रक्षेपण केले आहे. यासोबतच पृथ्वी उपग्रह (EOS-02) आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘AzadiSAT’ उपग्रह सुद्धा लाँच झाला आहे.
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, स्मॉल सॅटेलाइट ही 1 SSLV-D1 34 मीटर उंच आणि 120 टन वजनाची आहे. आज सकाळी ९.१८ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण केंद्रावरून लाँच करण्यात आली आहे. इस्त्रोने 500 किलोग्रामपेक्षा कमी वजन असलेल्या या उपग्रहाला पृथ्वीच्या कमी उंचीच्या अंतराळ कक्षेत स्थापित करण्यासाठी SSLV-D1 तयार केली आहे.
या प्रक्षेपणासाठी 56 कोटी खर्च करण्यात आले आहे. या सॅटेलाईटसोबत आझादी सेट उपग्रहाचे सुद्धा प्रक्षेपण करण्यात आले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण होत आहे. या दिनाचे औचित्य साधून देशभरातील 75 शाळेतील 750 विद्यार्थ्यांनी आझादी सेट हा उपगृह तयार केला आहे. या उपग्रहाचे वजन फक्त ८ किलोग्राम इतके आहे. यात सोलार पॅनल आणि सेल्फी कॅमेरा लावण्यात आलेला आहे. सोबतच यामध्ये लांबपल्ल्यापर्यंत संपर्क साधण्यासाठी ट्रांसपोंडर लावण्यात आलेला आहे.
हा उपग्रह सहा महिन्यांपर्यंत सेवा देणार आहे. या उपग्रहाची निर्मिती करणाऱ्या स्पेस किड्ज इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील वेगवेगळ्या 75 सरकारी शाळांमधून 10-10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. यामध्ये आठवी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे मिशन एसटीईएम (विज्ञान, प्रौद्योगिकी, इंजीनियरिंग आणि गणित) महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी पहिला उपक्रम आहे.
0 Comments